Pune Chitra Wagh : रघुनाथ कुचिक प्रकरणी माझ्यावर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे, चित्रा वाघांचं पुणे पोलिसांना पत्र
शिवसेना नेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) लैंगिक अत्याचार प्रकरणी माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप धादांत खोटे असल्याचे भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या आहेत. चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांना (Pune Police) यासंबंधी पत्र लिहिले आहे.
पुणे : शिवसेना नेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) लैंगिक अत्याचार प्रकरणी माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप धादांत खोटे असल्याचे भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या आहेत. चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांना (Pune Police) यासंबंधी पत्र लिहिले असून आपल्यावरील सर्व आरोप खोडून काढले आहेत. तसेच या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे. संबंधित पीडितेला मी सर्वतोपरी मदतच केली. ती एकटी पडली आहे, असे मला वाटले, म्हणून तिला सहाय्य केले. मात्र माझ्यावरच आरोप करण्यात आले आहेत. मात्र हे सर्व आरोप धादांत खोटे आहेत. त्यामुळे या सर्व आरोपांची सखोल चौकशी केली जावी, अशी आपली मागणी असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांसह इतर महत्त्वाच्या नेत्यांकडेही मागणी
पुणे पोलिसांना त्यांनी यासंबंधीचे पत्र दिले आहे. त्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्याकडेही त्यांनी मागणी केली आहे.
रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणात माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप धादांत खोटे आहेत
मी पिडीतेला सर्वतोपरी मदतचं केली तरीही माझ्यावरच खोटे आरोप केले गेलेत
या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी ही मागणी मी पुणे पोलिसआयुक्त ना मेल/लेखी अर्जाद्वारे केलीये
पोलिस सखोल चौकशी करतील हि अपेक्षा pic.twitter.com/7Kch7znhFN
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 18, 2022
पीडितेने काय केले होते आरोप?
चित्रा वाघ फेसकॉलवर माझ्याशी बोलायच्या आणि मला मेसेज पाठवायला लावायच्या, असा आरोप पीडित तरुणीने केला होता. त्यांनी जे मेसेज वाचून दाखवले ते त्यांनीच मला पाठवायला सांगितले होते. त्यांच्या सांगण्यानुसारच मी त्यांना मेसेज पाठवत होते, असा आरोप या तरुणीने केला होता. चित्रा वाघ यांना माझे काहीही पडलेले नाही. त्यांचा जो काही रोख आहे तो रघुनाथ कुचिक यांच्यावर आहे, असेही पीडित तरुणी म्हणाली होती.
हि मागणी @PuneCityPolice आयुक्तांसोबतचं राज्याचे मुख्यमंत्री मा.@CMOMaharashtra विधानसभा विरोधीपक्षनेता मा.@Dev_Fadnavis राज्याचे गृहमंत्री मा.@maharashtra_hmo राज्याचे मा.पोलिस महासंचालक @DGPMaharashtra विधानपरिषद विरोधीपक्षनेता मा.@mipravindarekar यांच्या कडेही केलेली आहे pic.twitter.com/BLEscEPWeQ
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 18, 2022