पुणे- ‘चाणक्याशिवाय चंद्रगुप्तांना कोण विचारेल. समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल. गुरुचं महत्त्व खूप मोठं असतं,’ असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh koshyari) यांनी केलं आहे. कोश्यारी यांच्या वक्तव्याचा विधानाला राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला आहे. त्याच्या विरोधात राज्यभर निषेध आंदोलन केलं जात आहे. याबाबत पुण्यातह (Pune ) राष्ट्रवादीने जोरदार आंदोलन करण्यात आले. महापालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर राष्ट्रवादीने (NCP) आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. या आंदोलकांना महापालिकेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र आंदोलक जबरदस्तीने आत प्रवेश करत असल्याने सुरक्षा रक्षक व आंदोलकांमध्ये प्रवेशद्वारावर बाचाबाची झाली आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन करत असताना राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांची जीभ घसरली. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करत असताना राज्यपालांचा ‘नालायक’ आणि ‘भडवा’ असा उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादीने केलं आंदोलन. आंदोलनाच्या समारोप भाषणात जगतापांनी हा उल्लेख केला आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद पुण्याच्या मावळमध्ये उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसने आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढता आपला निषेध व्यक्त केला. राज्यपालांनी त्वरित महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अन केलेलं वक्तव्य मागे घ्यावं.अशी मागणी यावेळी करण्यात आली.तसेच भाजपची भूमिका मांडण्यापेक्षा राज्यपालांनी त्यांचं काम निःपक्षपातीपणे करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
…अन् भर मांडवातच वधू-वराची Fighting, वराला कशामुळे आला राग? पाहा Viral video
VIDEO: भाजपने नवे ‘शिवव्याख्याते’ निर्माण केले, संजय राऊतांचा खोचक टोला