मोठा राडा, पुण्यातील आंबेगावात शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

पुण्यातील आंबेगावत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात मोठा राडा झाला. जवळपास दोन तास गोंधळ सुरु होता. तसेच मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर हा सगळा प्रकार घडत होता. दिलीप वळसे पाटील सर्वांना शांततेचं आवाहन करत होते. पण दोन तास गदारोळ सुरु राहीला.

मोठा राडा, पुण्यातील आंबेगावात शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले
पुण्यातील आंबेगावात शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले
Follow us
| Updated on: Sep 06, 2024 | 5:49 PM

पुण्यातील आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या समोरच हा सगळा राडा झाला. आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्व साधारण सभेत दोन तास गदारोळ सुरू होता. अजित पवार गटाचे मंत्री वळसे पाटील यांच्या विरोधात विधानसभा लढण्यास इच्छुक असणारे शरद पवार गटाचे देवदत्त निकम या दोघांचे हे समर्थक होते. “आम्हाला बसू दिलं नाही, मंचावर येऊ दिलं नाही, बैठकीत वळसे पाटलांनी स्वतःचा प्रचार केला, हे सगळं घडवून आणण्यासाठी ते गुंड घेऊन आले”, असा आरोप देवदत्त निकम यांनी केला. याच मुद्द्यावरुन दोन्ही गटात तुफान राडा झाला.

दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले, खुर्च्या नाचवत हीनवू लागले. मंत्री वळसे पाटलांनी शांततेचं आवाहन केलं. मात्र वेगवेगळ्या कारणांवरून राडा रंगतच राहिला. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी केली अन् देवदत्त निकमांना बाहेर जाण्याची विनंती करण्यात आली. मग देवदत्त निकमांनी आम्हाला सभेतून हकलण्यासाठी गुंड आणल्याचा आरोप केला. मात्र हे सगळे आरोप अजित पवार गटाने फेटाळले आहेत.

अजित पवार गटाची भूमिका काय?

विनाकारण राजकीय रंग देऊन स्वतःची पोळी भाजण्याचे प्रयत्न निकामांनी केल्याचा पलटवार अजित पवार गटाकडून करण्यात आला. देशातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या भीमाशंकर कारखान्याच्या वार्षिक बैठकीत हा गदारोळ करून काय साध्य केलं? उलट कारखाना बदनाम करण्याचे प्रयत्न केले, असा पलटवार अजित पवार गटाचे नेते शिवाजी आढळरावांनी केला.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.