एकनाथ शिंदे यांचा पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्यावर थेट वार, नक्की काय म्हणाले?

शिवसेनेचे मतदार आपल्यासोबतच आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आणि उद्धव ठाकरेंवर पलटवार करण्याची संधीही साधली.

एकनाथ शिंदे यांचा पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्यावर थेट वार, नक्की काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 11:30 PM

पुणे | कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीचा प्रचाराच्या तोफा थंडावल्यात. कसबा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रोड शो केला. रोड शोनंतर शिंदेंच्या निशाण्यावर आले ते म्हणजे उद्धव ठाकरे. ठाकरेंच्या गुरुवारच्या ऑनलाईन भाषणावरुन शिंदेंनी बोचरी टीका केली. सत्ता गेल्यावरही लाईनवर आले नाहीत, असं शिंदे म्हणालेत.

पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर थेट हल्लाबोल केला.शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख, जुने नेते असा केला. तसंच गुरुवारच्या ऑनलाईन भाषणावरुन निशाणाही साधला. सत्ता गेल्यावर लाईनवर येतील असं वाटलं होतं. पण ऑनलाईनच आहेत, अशी बोचरी टीका शिंदेंनी केलीय.

कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीचा प्रचार थांबलाय. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी युती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पूर्ण ताकद लावली.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासनेंसाठी रोड शो केला. कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचीही रॅली झाली. चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगतापांनी डोअर टू डोअर कॅम्पेन केलं. चिंचवडमध्येच राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटेंनी रॅली काढली. तर अजित पवारांनीही चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेतली.

कसब्यातून भाजपचे हेमंत रासने विरुद्ध काँग्रेस रवींद्र धंगेकर अशी लढत आहे. चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंमध्ये तिरंगी लढत आहे. अर्थात कसब्यात भाजप विरुद्ध काँग्रेस आणि भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत असली तरी भाजप आणि शिंदेंची शिवसेना. तसंच महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष पूर्ण ताकदीनं उतरलेत.

कारण निवडणूक प्रमुख नेत्यांसाठीच प्रतिष्ठेची झालीय. कसब्यात फडणवीस आणि नाना पटोलेंची प्रतिष्ठा पणाला आहे चिंचवडमध्ये फडणवीस आणि अजित पवारांची प्रतिष्ठ पणाला लागलीय.

मविआची एकजूट दाखवण्यासाठी कसब्यात काँग्रेसच्या उमेदवाराचाही अजित पवारांनी जोरदार प्रचार केला. चिंचवडमध्ये नाना पटोलेंनीही राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी सभा घेतल्या. शिवसेना फुटल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होतेय. त्यातच शिवसेना धनुष्यबाण शिंदेंना मिळालंय. त्यामुळं आदित्य ठाकरेही आक्रमकतेनं प्रचारात उतरले.

तर कसब्यातून भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही प्रचारात उतरले. शिवसेनेचे मतदार आपल्यासोबतच आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आणि उद्धव ठाकरेंवर पलटवार करण्याची संधीही साधली.

शिंदेंच्या याच टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलंय. आम्ही शिवसेना संपवली नाही. तर शिवसेना कोणी फोडली असा सवाल अजित पवारांनी शिंदेंना केलाय. कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत प्रचाराच्या तोफा थंडावल्यात. आता शनिवारी घरोघरी भेटीगाठींवर उमेदवारांचा भर असेल आणि रविवारी उमेदवारांसह भाजप, काँग्रेस तसंच राष्ट्रवादीचं नशिब EVM मध्ये बंद होईल.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....