फुले दाम्पत्यांनी सांगितलं धर्माधर्मामध्ये भांडणं लावू नका, आपण फक्त बोलतो, पण पाळणार कोण?; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांसमोर सवाल

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी धर्माधर्मामध्ये भांडण लावू नका, समाजात तेढ निर्माण करू नका असा संदेश समाजाला दिला. आपण राजकारणी एका व्यासपीठावर आल्यावर त्याबाबत बोलतो. पण हा विचार पाळणार कोण? त्याची सुरुवात कोण करणार? कोण हा विचार पुढे नेणार?, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.

फुले दाम्पत्यांनी सांगितलं धर्माधर्मामध्ये भांडणं लावू नका, आपण फक्त बोलतो, पण पाळणार कोण?; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांसमोर सवाल
फुले दाम्पत्यांनी सांगितलं धर्माधर्मामध्ये भांडणं लावू नका, आपण फक्त बोलतो, पण पाळणार कोण?; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांसमोर टोला
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 2:55 PM

पुणे: महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी धर्माधर्मामध्ये भांडण लावू नका, समाजात तेढ निर्माण करू नका असा संदेश समाजाला दिला. आपण राजकारणी एका व्यासपीठावर आल्यावर त्याबाबत बोलतो. पण हा विचार पाळणार कोण? त्याची सुरुवात कोण करणार? कोण हा विचार पुढे नेणार?, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच हा मुख्यमंत्र्यांनी हा टोला लगावला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीत (Savitribai Phule Pune University Pune) सावित्रीबाई फुले यांच्या 12 फुटी उंचीच्या पुतळ्याचं (Savitribai Phule Statue) आज लोकार्पण पार पडले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच आमनेसामने आले. दोघेही दृष्यप्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते.

फुले दाम्पत्यांनी त्याकाळात दुष्काळात अन्नछत्रं काढली. आपण काय करतो? आपण म्हणजे सर्वांबद्दल बोलतोय. एखाद्या पक्षाबद्दल बोलत नाही. आजचे युग हे जाहिरातबाजीचे आहे. आपण काही केलं तर बॅनरबाजी करतो. जाहिरातबाजी करतो. हे करावं लागतं. नाही तर मग हो कोणी केलयं कळलं नाही तर मतं कसे मिळणार? पण तो काळ आठवला तर महात्मा फुलेंना आमदार व्हायचं होती की नगरसेवक व्हायचं होतं? सावित्रीबाईंना मंत्री व्हायचं होतं की पंतप्रधान व्हायचं होतं? काही व्हायचं नव्हतं त्यांना. केवळ माझा देश आणि समाज निरोगी असावा हाच त्यांचा हेतू, असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी काढला.

फुल्यांनी आयुष्यभर ज्ञानदानाचं काम केलं

कोणतंही कार्य करताना अनेकदा विरोध होतो. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष येतो. संघर्ष चुकलेला नाही. पण 1848 साली त्यांनी पहिली शाळा सुरू केली. नतंर स्वातंत्र्ंय संग्राम सुरू झाला. नंतर देशही स्वातंत्र्य झाला. देश बुरसटलेल्या परंपरेत अकडला तर देश स्वातंत्र्य होऊन काही फायदा होणार नाही, हा विचार त्यांनी केला. त्यामुळेच त्यांनी ज्ञानदानचं काम केलं, असं त्यांनी सांगितलं.

सावित्रीबाई फुले याच एक विद्यापीठ

अभिमान वाटावा असा हा आजचा सोहळा आहे. 2014 ला पुणे विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले. आज आपण त्यांचा पुर्णाकृती पुतळा बसवत आहोत. सावित्रीबाई स्वत: एक विद्यापीठ होत्या. त्यांचे एकूण चरित्र वाचले तर त्यांचे काम लक्षात येते. फुले दाम्पत्याने स्वत:च्या सुखी संसारापलिकडे जाऊन समाज सुखाचे स्वप्नं पाहिले, त्यासाठी संघर्ष केला. समोर सगळा अंधार असतांना या दाम्पत्याने सदैव समाज बांधवासाठी, देशातील नागरिकांसाठी कामं केली. लोकांच्या आयुष्यात फुले कशी फुलतील हे पाहिले. सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आपल्या सर्वांचे कर्तव्य, असं ते म्हणाले.

कार्याचा वारसा जपण्याचे नैतिक ओझे

प्लेगची लागण झालेल्या पांडुरंग नावाच्या मुलाला वाचवताना सावित्रीबाईंना ही प्लेगची लागण झाली. त्यात त्या गेल्या. त्यांनी आपल्या आयुष्याचा विचार केला नाही. अशा सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या कार्याचा वारसा जपण्याचे, विद्यापीठावर नैतिकतेचे ओझे आहे, असं त्यांनी सांगितलं.

विद्यापीठातील विद्यार्थ्याचा सन्मानच व्हावा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी म्हणून विद्यापीठाचा विद्यार्थी कुठेही गेला तरी त्याचा सन्मान व्हावा, विद्यापीठाची प्रतिष्ठा वाढेल असे विद्यार्थी या विद्यापीठात घडावेत, तसा अभ्यासक्रम निश्चित व्हावा अशी अपेक्षा. हे विद्यार्थी कुठल्याही स्पर्धात्मक वातावरणात सन्मानाने पुढे गेले पाहिजेत एवढी क्षमता त्यांच्यात निर्माण व्हावी, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या:

Savitribai Phule Statue| क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुलेंच्या 12 फुटी पुतळ्याचे अनावरण, ठाकरे, फडणवीस एकाच मंचावर

सावित्रीबाईंनी महाराष्ट्राचे वैचारिक पुढारलेपण केले; शिक्षण मोफत देण्याची पहिली मागणी त्यांचीच, काय म्हणाले फडणवीस?

Pune Metro | पुणे मेट्रोश्रम साधकांचा पुष्पा अभिषेक सोहळा; चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पुष्प उधळून त्यांचा सन्मान…

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.