VIDEO: माझ्यावरील हल्ला मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच, पंतप्रधानांकडे तक्रार करणार; किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

माझ्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. हा हल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या (cm uddhav thackeray) आदेशनानुसारच झाला आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे.

VIDEO: माझ्यावरील हल्ला मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच, पंतप्रधानांकडे तक्रार करणार; किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप
माझ्यावरील हल्ला मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच, पंतप्रधानांकडे तक्रार करणार; किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 12:57 PM

पुणे: माझ्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. हा हल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या (cm uddhav thackeray) आदेशनानुसारच झाला आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्याकडे तक्रार करणार असून त्यासाठी गुरुवारी दिल्लीत जाणार आहे, असं सोमय्या यांनी सांगितलं. पुणे महापालिका परिसरात किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला होता. सोमय्या यांना महापालिका परिसरात रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर, त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. महत्वाची बाब म्हणजे शिवसैनिकांनी अंगावर धावून येण्याचा प्रयत्न करताच सुरक्षा रक्षक सोमय्यांना तिथून घेऊन निघाले. त्या गोंधळात सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यांवर सोमय्या कोसळले. त्यामुळे सोमय्या यांना दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावरील हल्ल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर काल जो हल्ला झाला. तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानेच झाला आहे. येत्या गुरुवारी मी दिल्लीत जाणार आहे. राष्ट्रीय डिझास्टरचे प्रमुख आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या हल्ल्याची तक्रार करणार आहे. तसेच उद्या रत्नागिरीला जाणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांचा बंगला पाडला की नाही याचा फॉलोअप घेण्यासाठी मी रत्नागिरीला जाणार आहे, असं सोमय्या यांनी सांगितलं.

काल नेमकं काय घडलं?

सोमय्या काल पुणे महापालिकेत आले होते. पुणे महापालिका परिसरात किरीट सोमय्या यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर, त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु झाल्यानंतर, महत्वाची बाब म्हणजे शिवसैनिकांनी अंगावर धावून येण्याचा प्रयत्न करताच सुरक्षा रक्षक सोमय्यांना तिथून घेऊन निघाले. त्या गोंधळात सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यांवर कोसळल्याचा एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोमय्या यांना दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये काही शिवसैनिक सोमय्या यांच्या अंगावर धावून जाताना दिसून येत आहेत. काहीजण गाडीसमोर आडवे पडून सोमय्या यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. तर एक व्यक्ती सोमय्या यांच्या गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे. महत्वाची बाब म्हणजे एक महिला सोमय्या यांच्या गाडीवर चप्पल फेकत असल्याचंही एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोमय्या यांच्यावरील हा हल्ला ठरवून केला गेला का? असा सवाल आता भाजपकडून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या:

‘महाराष्ट्रात लोकशाहीचा मुडदा पाडू नका’, किरीट सोमय्यांवरील हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

Video : किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांचा हल्ला? सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यांवर कोसळले!

Breaking : किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी, सोमय्यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न!

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.