मार्गदर्शन करणं हा राजकारण्यांचा आवडता छंद, पर्यायी इंधन परिषदेत मुख्यमंत्री ठाकरेंचा संवाद

मार्गदर्शन करणं हा राजकारण्यांचा आवडता छंद आहे. विषय माहिती असो अथवा नसो, पण इथे सगळे तज्ज्ञ असताना मी ते धाडस करणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. पर्यायी इंधन परिषदेत (Alternative fuel conference) ते बोलत होते.

मार्गदर्शन करणं हा राजकारण्यांचा आवडता छंद, पर्यायी इंधन परिषदेत मुख्यमंत्री ठाकरेंचा संवाद
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्रीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 1:58 PM

पुणे : मार्गदर्शन करणं हा राजकारण्यांचा आवडता छंद आहे. विषय माहिती असो अथवा नसो, पण इथे सगळे तज्ज्ञ असताना मी ते धाडस करणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. पर्यायी इंधन परिषदेत (Alternative fuel conference) ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video conferencing) सहभागी झाले होते. नागरिकांशी त्यांनी ऑनलाइन संवाद साधला. ते म्हणाले, की इथे पेट्रोल डिझेलवर चर्चा होते. 100-200 वर्ष आपण एखादी गोष्ट वापरतो अन् त्यानंतर त्याला पर्याय शोधतो, असे ते म्हणाले. गेली दोन दिवस महाराष्ट्रात लोकांच्या दृष्टीने चांगली काम होत आहेत. अभिमान आहे पुण्यात पर्यायी इंधनाची परिषद होत आहे. जिथे जिथे शक्य आहे तिथे ही परिषद घेऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

‘उद्योजकांना महाराष्ट्रात यावे वाटले पाहिजे’

महाराष्ट्रात उद्योजकांना यावेसे वाटले पाहिजे. गुंतवणूक करताना स्पीड ब्रेकर आले तर चालणार नाही. गुंतवणूकदारांच्या मार्गातले स्पीड ब्रेकर काढण्याचेही काम आम्ही करत आहोत. आम्ही फक्त महाराष्ट्राचा विचार करत नाही देशाचा विचार करतो. महाराष्ट्र हे दिशा देणार राज्य राहिल आहे, असे ते म्हणाले. आगगाड्या आल्या, कामगार कोळसा टाकत राहायचे, लहाणपणी गाणे होते, धुरांच्या रेषा लांबून पाहताना बरे वाटायचे, आज आपले लक्ष गेल्याने धूर टाकण्याऱ्या गाड्या बंद झाल्या, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

‘ग्लोबल वार्मिंगचा धोका टाळण्यासाठी सर्वांकडून प्रयत्न हवा’

दोन वर्षे आपले आयुष्य पॉझ झाले होते. आता निर्बंध हटवले तरी कोरोना गेलेला नाही. जसा कोरोना हा व्हायरस आहे तसे प्रदूषण हा सुद्धा व्हायरस आहे. पर्यावरणाचा विचार केला नाही तर फटका बसतोच. तर ग्लोबल वार्मिंगचा धोका टाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. त्यादृष्टीने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा संवाद, पाहा व्हिडिओ – 

आणखी वाचा :

Pune Video | पुण्यात गुंडांचा उच्छाद, फुकट भाजी न दिल्याने तरुणाला पाया पडायला लावलं

Video : बिबवेवाडीनंतर आता उंड्रीत बाऊन्सरकडून पालकांना धक्काबुक्की, युरो शाळा प्रशासनाची मुजोरी

Dilip Walse Patil : ‘धार्मिक वाद निर्माण करून रस्त्यावर उतरायचं आणि पुन्हा कायदा-सुव्यवस्था बिघडली म्हणून आरोप करायचे’

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.