पुणे : मार्गदर्शन करणं हा राजकारण्यांचा आवडता छंद आहे. विषय माहिती असो अथवा नसो, पण इथे सगळे तज्ज्ञ असताना मी ते धाडस करणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. पर्यायी इंधन परिषदेत (Alternative fuel conference) ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video conferencing) सहभागी झाले होते. नागरिकांशी त्यांनी ऑनलाइन संवाद साधला. ते म्हणाले, की इथे पेट्रोल डिझेलवर चर्चा होते. 100-200 वर्ष आपण एखादी गोष्ट वापरतो अन् त्यानंतर त्याला पर्याय शोधतो, असे ते म्हणाले. गेली दोन दिवस महाराष्ट्रात लोकांच्या दृष्टीने चांगली काम होत आहेत. अभिमान आहे पुण्यात पर्यायी इंधनाची परिषद होत आहे. जिथे जिथे शक्य आहे तिथे ही परिषद घेऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्रात उद्योजकांना यावेसे वाटले पाहिजे. गुंतवणूक करताना स्पीड ब्रेकर आले तर चालणार नाही. गुंतवणूकदारांच्या मार्गातले स्पीड ब्रेकर काढण्याचेही काम आम्ही करत आहोत. आम्ही फक्त महाराष्ट्राचा विचार करत नाही देशाचा विचार करतो. महाराष्ट्र हे दिशा देणार राज्य राहिल आहे, असे ते म्हणाले. आगगाड्या आल्या, कामगार कोळसा टाकत राहायचे, लहाणपणी गाणे होते, धुरांच्या रेषा लांबून पाहताना बरे वाटायचे, आज आपले लक्ष गेल्याने धूर टाकण्याऱ्या गाड्या बंद झाल्या, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
दोन वर्षे आपले आयुष्य पॉझ झाले होते. आता निर्बंध हटवले तरी कोरोना गेलेला नाही. जसा कोरोना हा व्हायरस आहे तसे प्रदूषण हा सुद्धा व्हायरस आहे. पर्यावरणाचा विचार केला नाही तर फटका बसतोच. तर ग्लोबल वार्मिंगचा धोका टाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. त्यादृष्टीने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा संवाद, पाहा व्हिडिओ –