“काँग्रेस मुक्त भारत होऊ शकत नाही”; शरद पवार यांनी काँग्रेसच्या इतिहासाबरोबरच संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास मांडला
मागील काही दिवसांपासून राजकीय टीका करण्याबरोबरच काही लोकांकडून भारत काँग्रेस मुक्त करायचा आहे अशी वल्गना केली जाते आहे. पण काँग्रेस मुक्त भारत होऊ शकत नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुणेः भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 137 व्या वर्धापनदिनी महापुरुषांचे छायाचित्र प्रदर्शनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल 24 वर्षानंतर काँग्रेस भवनला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी प्रदर्शन पाहत असताना काँग्रेसने भारताला दिलेल्या भरीव कामगिरीची आठवण करून देत त्यांनी काँग्रेसच्या राजकारणाची आणि संयुक्त महाराष्ट्राचाही त्यांनी इतिहास सांगितला. यावेळी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी केलेल्या कार्याचीही शरद पवार यांनी आठवण करून दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचा इतिहास सांगताना त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनाच्या निमित्ताने राजकीय, सामाजिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीचा त्यांनी गौरव केला.
यावेळी त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास सांगताना इंदिरा गांधी यांच्या माध्यमातून पंडित जवाहरलाल नेहरू यांना कन्व्हीन्स केल्या नंतर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली असंही त्यांनी यावेळी सांगताना अधोरेखित केले.
मागील काही दिवसांपासून राजकीय टीका करण्याबरोबरच काही लोकांकडून भारत काँग्रेस मुक्त करायचा आहे अशी वल्गना केली जाते आहे. पण काँग्रेस मुक्त भारत होऊ शकत नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
देशासाठी काँग्रेसची विचारधारा आणि योगदान कुणालाच दुर्लक्षित करता येणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट करून सांगितले. काँग्रेसच्या धोरणांबाबत मतभेद असतील आणि तसे मतभेद माझेही काही आहेत मात्र काँग्रेसला सोबत घेऊनच राजकारण करावे लागणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल 24 वर्षांनंतर पुण्यातील काँग्रेसला भेट दिली आहे. त्यामुळे काँग्रेससह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही मोठी गर्दी केली होती.