Eknath Shinde : फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात का, ते शिंदेंच्या बंडाचा बहुमताशी आकड्यांचा खेळ; घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी तुमच्या मनातल्या 5 प्रश्नांची उत्तरं सविस्तर दिली

भाजपा सत्तास्थापन करू शकते का, या सर्वांविषयी घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी सविस्तर माहिती दिली. कोणती कलमे आणि नेमके काय नियम आहेत, याचे बारकावे त्यांनी टीव्ही 9सोबत बातचित करताना सांगितले.

Eknath Shinde : फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात का, ते शिंदेंच्या बंडाचा बहुमताशी आकड्यांचा खेळ; घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी तुमच्या मनातल्या 5 प्रश्नांची उत्तरं सविस्तर दिली
कायदे तज्ज्ञ उल्हास बापट Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 10:38 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर आता भाजपातर्फे सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्यासोबत 37 आमदार असणे घटनेनुसार गरजेचे आहे. येथे तीन आमदार अधिक आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भाजपाने एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसोबत बहुमताचा आकडा गाठल्यास भाजपाला सत्तास्थापन करता येणार आहे. मात्र त्यासाठी त्यांना राज्यपालांसमोर या सर्व आमदारांचे पत्र ठेवावे लागणार आहे. याचसंबंधी नेमकी काय प्रक्रिया आहे, भाजपा सत्तास्थापन करू शकते का, या सर्वांविषयी घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी सविस्तर माहिती दिली. कोणती कलमे आणि नेमके काय नियम आहेत, याचे बारकावे त्यांनी टीव्ही 9सोबत बातचित करताना सांगितले.

  1. बहुमत भाजपाच्या बाजूने – एकनाथ शिंदे यांच्यासोबत 37 आमदार असतील तर बहुमत त्याबाजूने (भाजपा) गेले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अशा परिस्थितीत राजीनामा देणे योग्य ठरते. त्यानंतर राज्यपाल मुख्यमंत्रीपदाबाबत बहुमत असलेल्या पक्षाला विचारणा करतात. याबाबतीत राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे अधिकार सारखेच आहेत.
  2. …तर राष्ट्रपती राजवट लावावी लागेल – सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात. राज्यपाल त्यांना बोलावू शकतात. मात्र देवेंद्र फडणवील म्हणत आले आहेत, की ते स्वत:च्या बळावर मुख्यमंत्री होतील. मात्र एकनाथ शिंदे समर्थकांसह त्यांनी सरकार बनवले तर त्यांच्याकडे दोन वर्ष राहतील. दरम्यान, त्यांनी मुख्यमंत्री होण्यास नकार दिला, तर मात्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकतो. राष्ट्रपती राजवट लागू झाली, तर सहा महिन्यांच्या आत निवडणुका घ्याव्या लागतात.
  3. पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील – राष्ट्रपती राजवटीनंतर झालेल्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाला बहुमत मिळाले तर ते पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील. सरकार स्थिर राहील. घटनेनुसार सध्यातरी एकूण अशीच परिस्थिती दिसत आहे.
  4. प्रत्यक्ष हजर केल्यास… – पाठिंबा असलेल्या आमदारांचे पत्र राज्यपालांना दिल्यास सत्तास्थापन होऊ शकते. तसेच याविरोधात न्यायालयात अपीलही करता येते. तर पत्राऐवजी प्रत्यक्ष त्या आमदारांना हजर केल्यास ती प्रक्रिया जास्त सोयीची ठरते. राज्यपालांसमोर सर्व आमदारांची परेड झाली भाजपाच्या आमदारांसोबत तर सत्तास्थापन करणे सोपे होईल.
  5. हे सुद्धा वाचा
  6. आकड्यांचा खेळ आणि बहुमत – 288पैकी 144 जणांची पत्र राज्यपालांना दिली तर संख्याबळ सिद्ध होईल. नो कॉन्फिडन्स मोशन आणले गेले तर मतदानाच्या वेळी आपोआपच समजेल की कोणत्या पक्षाकडे किती लोक आहेत. त्यामुळे बहुमत मांडण्यासाठी हे दोन सरळ मार्ग आहेत.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.