Ulhas Bapat : तरीही राज्यपालांना विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकार नाहीच; कायदे तज्ज्ञ उल्हास बापट यांचा दावा

विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर 16 आमदारांना नोटीस बजावत दोन दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले होते. ही मदत आज संपली. याबाबत सुप्रीम कोर्टात आपले मत नोंदवले आहे. दोन दिवसाची जी मुदत दिली होती ती चुकीची आहे, असं न्यायालयाने सांगितलं आहे.

Ulhas Bapat : तरीही राज्यपालांना विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकार नाहीच; कायदे तज्ज्ञ उल्हास बापट यांचा दावा
कायदे तज्ज्ञ उल्हास बापट Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 7:05 PM

पुणे : शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टा (Supreme Court)त सुनावणी झाली. विधानसभा अध्यक्षांनी पाठवलेल्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी शिंदे गटाला 11 जुलैपर्यंत सुप्रीम कोर्टाकडून मुदत देण्यात आली आहे. यामुळे आमदारांवरील निलंबनाची कारवाई (Suspension Action) तूर्तास टळली आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर जेष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. कायद्यातील तरतुदींबाबत विश्लेषण केले आहे. विशेष अधिवेशन बोलावण्याचा राज्यपालांना अधिकार नाही, असा दावा बापट यांनी केला आहे. तसेच मविआच्या काऊंटडाऊनबाबत बोलणयास त्यांनी नकार दर्शवला.

11 तारखेपर्यंत उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील

विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर 16 आमदारांना नोटीस बजावत दोन दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले होते. ही मदत आज संपली. याबाबत सुप्रीम कोर्टात आपले मत नोंदवले आहे. दोन दिवसाची जी मुदत दिली होती ती चुकीची आहे, असं न्यायालयाने सांगितलं आहे. 11 तारखेपर्यंत स्टेटस खो दिला गेलाय. अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही. त्यामुळे 11 तारखेपर्यंत उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील. तसेच या निर्णयामुळे नवं सरकार स्थापण्यासाठी एक प्रकारे 15 दिवसांचा अवधीच मिळालाय का? याबाबत आपल्याला माहित नसल्याच बापट यांनी स्पष्ट केले.

शिंदे दोन तृतीयांश घेवून बाहेर पडले तर त्यांना मर्ज करावे लागेल

शिंदे गटातील आमदारांना मुदवाढ मिळाल्यामुळे त्यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीचा पाठिंबा काढल्याचं पत्र राज्यपालांना पाठवण्यात येणार असून दुसरीकडे भाजपच्या गोटातही हालचालींना वेग आलाय. यामुळे आजचा निर्णय म्हणजे मविआचा काऊंटडाऊन समजायचं का? असा सवाल बापट यांना करण्यात आला. मात्र, या विषयावर बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे. तसेच विशेष अधिवेशन बोलावण्याचा राज्यपालांना अधिकार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिंदे दोन तृतीयांश घेवून बाहेर पडले तर त्यांना मर्ज करावे लागेल. त्यांना शिवसेना नाव घेता येणार नाही, असेही उल्हास बापट यांनी नमूद केले.

हे सुद्धा वाचा

विधानसभा उपाध्यक्षकांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

बंडखोर आमदारांना दिलेल्या अपात्र नोटीशीवरुन सुप्रीम कोर्टाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना चांगलेच फटकारले आहे. उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव असताना ते स्वतः न्यायधीश कसे बनू शकतात, असा सवाल सुप्रीम कोर्टाने विचारला आहे. तसेच उपाध्यक्षांना नोटीस बजावत पाच दिवसात त्यांचं प्रमाणपत्र आणि संबंधित कागदपत्रं सादर करण्याचे आदेश देण्यात आला आहे. शिवाय उपाध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आला होती की नाही ? तो का फेटाळून लावण्यात आला ? याची माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यास सांगितले होते. (Constitutionalist Ulhas Bapats reaction to the decision of the Supreme Court)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.