पुणेकरांसाठी गुड न्यूज ! वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी दोन नव्या उड्डाण पुलांची लवकरच उभारणी

पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्याची दोन नवीन उड्डाण पुलांच्या बांधकामाला मंजूरी मिळाली असून लवकरच त्यांची उभारणी सुरु होणार आहे.

पुणेकरांसाठी गुड न्यूज ! वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी दोन नव्या उड्डाण पुलांची लवकरच उभारणी
pune bridgeImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 06, 2023 | 1:35 PM

पुणे | 6 सप्टेंबर 2023 : पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी निरनिराळ्या योजना आखल्या जात आहेत. पुण्यातील चांदणी चौकातील पुल उभारल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आता पुण्यात आणखी दोन नव्या उड्डाण पुलांची उभारणी करण्यात येणार आहे. यातील एका उड्डाण पुलाची उभारणी सनसिटी आणि कर्वेनगर दरम्यान होणार आहे. तर 49 वर्षे जुना साधु वासवानी ब्रिज पाडून नव्याने त्या जागी नवा उड्डाण पुलाची बांधण्यात करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या पुलाची उभारणी करणार आहे.

पुण्यातील सिंहगड रोड आणि कर्वेनगर आणि कोथरुड परीसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सनसिटी आणि कर्वेनगर दरम्यानच्या उड्डाण पुलाला मंजूरी देण्यात आली होती. परंतू कंत्राटदार बॅंककरप्ट झाल्याने काम रखडले होते. आता नवीन या पुलाचे काम 12 टक्के कमी बोलीवर विजय सुदाम पटेल या नव्या कंत्राटदाराला दिले आहे. पुणे महानगर पालिकेच्या स्टॅंडींग कमिटीने या पुलाच्या कामाला मंजूरी दिली असून 37 कोटी 4 लाखात आता या पुलाचे काम होणार आहे.

साधू वासवानी पुलाच्या जागी नवा पुल

49 वर्षे जुन्या साधू वासवानी पुलाला पाडून त्या जागी नवा पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. कॅम्प आणि कोरेगाव पार्क विभागाला जोडणाऱ्या या पुलाच्या बांधकामासाठी पुणे महानगर पालिकेने नेमलेल्या सल्लागाराने नवा ब्रिज बांधण्याचा सल्ला दिला आहे. एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यासाठी सर्वात कमी बोली लावल्याने 58 लाख 11 हजार 336 रुपयांचे टेंडर मंजूर झाले आहे. या पुलाचे काम सुरु झाले की येथील वाहतूक पुणे स्टेशन एरीयातून वळविण्यात येणार आहे. या पुलाचे उभारणी करण्यासाठी मान्सून काळ वगळून 24 महिने लागणार आहेत. पर्यायी मार्गावरुन वाहतूक वळविण्यात येणार आहे.

मुळा नदीवर उड्डाण पुल

दरम्यान पिंपरी-चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन मुळा नदीवर बोपोडी आणि औंध दरम्यान नवा पुल उभारणार असून त्याने पुण्याला पिंपरी-चिंचवड शहराशी जोडता येणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी 36.25 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पुणे महानगर पालिका या पुलाची अर्ध्या रक्कमेचा भार ( 18.13 कोटी ) उचलणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.