Corona Update | युरोपीय देशात कोरोनाचा उद्रेक; भारतही अर्लट मोडवर, पुणे विभागीय आयुक्तांनी बोलावली बैठक

पुण्याचे विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक घेणार आहेत. यामुळे मागील काही दिवसांपासून बंद झालेल्या कोरोनाच्या बैठकी पुन्हा सुरु होणार आहेत. राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनीही सर्वांना अलर्ट (alert)  राहण्याच्या सूचना दिल्या आलेल्या आहेत.

Corona Update | युरोपीय देशात कोरोनाचा उद्रेक; भारतही अर्लट मोडवर, पुणे विभागीय आयुक्तांनी बोलावली बैठक
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंटImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 12:31 PM

पुणे – युरोपीय देशात कोरोनाच्या पुन्हा उद्रेक होताना दिसून येत आहे. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा आरोग्य विभागही अलर्ट मोडवर आला आहे. कोरोनामुळे (Corona ) सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नव्याने येऊ घातलेल्या या कोरोनाच्या लाटेमुळे पुन्हा एकदा सर्वजण सतर्क झाले आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक घेणार आहेत. यामुळे मागील काही दिवसांपासून बंद झालेल्या कोरोनाच्या बैठकी पुन्हा सुरु होणार आहेत. राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास (State Health Secretary Pradip Vyas) यांनीही सर्वांना अलर्ट (alert)  राहण्याच्या सूचना दिल्या आलेल्या आहेत. येत्या शुक्रवार (25  मार्च ) पासून पुन्हा कोरोना बाबतच्या आढावा बैठकीला सुरुवात होणार आहे. याबरोबरच भारतात कोरोनाची चौथी लाट येणार का? या लाटेचा नेमका किती परिणाम होणार आहे याबाबतचीशक्यता आय एम ए चे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी नुकतीच दिली आहे.

जेष्ठ व्यक्तींना धोक्याची  शक्यता अधिक

भारत व महाराष्ट्रात साधारण नोव्हेंबर 2021 फेब्रुवारी 2022पर्यत आधी ओमायक्रोन बी ए 1 व बी ए 2 या ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटचे रुग्ण सगळीकडं आढळत होते. या रुग्णांना फारशी बाधा होत नाही बी 2 हा बी1 सारखाच विषाणू आहे, हा विषाणू फार वेगाने पसरतो. मात्र यामुळे रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही . साधारण 70 च्या पुढच्या वयोगटातील लोकांना याचा धोका संभवतो. त्यातही ज्या लोकांचे लसीकरण झाले नाही. त्यांना याची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या विषाणुचा धोका या टाळण्यासाठी अधिक खबरदारी घेतली पाहिजे. यासाठी लसीकरणाचा वेग वाढवायला हवा. याबरोबच शहरातील रुग्णालयातील सुविधा सज्ज ठेवणे आवश्यक आहे. याबरोबरच कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. लसीकरण वेगाने होणे आवश्यक असल्याची माहिती डॉ. भोंडवे यांनी दिली आहे.

या देशामध्ये वाढतोय कोरोना

जरी कोरोनाचा नवीन विषाणू आला तरी तो फारसा वेगाने पसरणारा नाही. अशी शक्यता आहेत . मात्र हा विषाणू पसरू नये यासाठीची काळजी आपण घ्यायलाच हवी असे मत डॉ अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले आहे. चीन आणि इतर युरोपीय देशातील वाढती रुग्णसंख्या पाहता चौथी लाट येण्याचा शक्यता व्यक्त केली जात आहे. जगामधील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या आठ टक्क्यांनी वाढली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चीन या हाँगकाँग , दक्षिण कोरिया या देशांमध्ये ही रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. अमेरिकेतही रुग्णसंख्या वाढली आहे. युरोपीय देशांमध्ये जर्मनी जपान येथेही कोरोना रुग्ण वाढत आहेत.

Mumbai Dog Murder : इथं माणूसकी मेली, पाळीव कुत्र्यांवर गाडी घातली, गुन्हा दाखल, घटनेचे पुरावे CCTV मध्ये कैद

Wardha Crime | जमिनीच्या खरेदी-विक्रीवरून वाद, बेटबॉलच्या दंड्याने जीवघेणा हल्ला, हिंगणघाटच्या भाजप शहराध्यक्षास ठोकल्या बेड्या

Gehlot on Nashik Crime | निवडणुकीच्या तोंडावर माझ्याविरोधात कुंभाड; राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोतांच्या मुलाचे स्पष्टीकरण

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.