कोरोना झालाय, पण घरीच राहून उपचार घ्यायचेत , मग 25 हजाराच्या बाँडवर सही करा

रुग्णांना ठेवण्यासाठी हॉटेल्स भाड्याने घेण्याची वेळ रुग्णालयांवर आलीय. | Pune Coronavirus

कोरोना झालाय, पण घरीच राहून उपचार घ्यायचेत , मग 25 हजाराच्या बाँडवर सही करा
Follow us
| Updated on: Apr 08, 2021 | 8:20 AM

पुणे: कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणा अपुरी पडू लागलेल्या पुण्यात आता प्रशासनाकडून नवा मार्ग चाचपून पाहिला जात आहे. अनेक रुग्ण कोरोना (Coronavirus) झाल्यानंतर सरकारी रुग्णालय किंवा कोव्हिड सेंटरऐवजी घरीच राहून उपचार करण्यासाठी आग्रही असतात. मात्र, कोरोनाचा वाढता प्रकोप पाहून सरकारने होम क्वारंटाईनचा पर्याय बंद केला होता. (You have to sign Rs 25000 bond for home isolation in Pune)

मात्र, आता पुणे महागनरपालिकेने होम आयसोलेशन आणि क्वारंटाईनचा पर्याय पुन्हा सुरु केला आहे. त्यासाठी पालिका संबंधित रुग्णांकडून 25 हजारांचे बाँड सही करुन घेणार आहे. त्यानंतरच रुग्णांना किंवा कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या लोकांना होम आयसोलेशनमध्ये राहता येईल.

होम आयसोलेशनमध्ये असणारे लोक बाहेर फिरतानाच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे सरकारकडून निर्बंध कठोर करण्यात आले होते. मात्र, आता होम क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या रुग्णांकडून पालिका 25 हजार रुपयांचा बाँड सही करुन घेणार आहे. त्यानंतर हे रुग्ण बाहेर फिरताना आढळून आल्यास त्यांच्याकडून 25 हजार रुपये वसूल केले जातील.

पुण्यातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढली

पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्याच्या घडीला पुणे शहरात 45 हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी सुमारे 38,401 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. ही संख्या अशीच वाढत राहिल्यास आगामी काळात पुणे जिल्ह्यात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेडसचा तुटवडा जाणवण्याची दाट शक्यता आहे.

कोरोना संकटातून वाचण्यासाठी आता लष्कराची मदत घेतली जाणार

राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस विदारक बनत चालली आहे. पुण्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे पुण्यातील रुग्णालयेही आता अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे रुग्णांना ठेवण्यासाठी हॉटेल्स भाड्याने घेण्याची वेळ रुग्णालयांवर आलीय. अशावेळी पुण्यातील कोरोनाचा सामना करण्यासाठी आता भारतीय लष्कराची मदत घेतली जाणार आहे.

पुण्यात सध्या व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड्सची कमतरता जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पुण्यातील लष्कराचं रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांनासाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आलीय. लष्कराच्या रुग्णालयात ICU बेडसह अन्य सुविधाही उपलब्ध आहेत. पुणे प्रशासनानं लष्कराकडे रुग्णालय उलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. आज संध्याकाळपर्यंत लष्कराकडून उत्तर येण्याची अपेक्षा असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे लष्करानं जर आपलं रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं करुन दिलं, तर कोरोना संकटात पुणे प्रशासनाला काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

कोरोनाची दुसरी लाट त्सुनामीसारखी, एप्रिल अखेरपर्यंत रुग्णसंख्या 12 लाखांवर जाणार; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतून खुलासा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसमोर ‘धारावी पॅटर्न’ही फोल?; मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान

पुण्यात कोरोनाचा कहर, बेड हवाय तर काय करायचं?; इतर सुविधांसाठी प्रोसेस काय?

(You have to sign Rs 25000 bond for home isolation in Pune)

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.