Coronavirus: पुण्यातील 607 गावांमध्ये आठवडाभरात एकही रुग्ण नाही, 42 गावांमध्ये हायरिस्क अलर्ट

Pune Coronavirus | 194 गावांमध्ये अजूनही दररोज कोरोनाचे नवे रुग्ण सापडत आहेत. तर 42 गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या इतकी वाढली आहे की याठिकाणी प्रशासनाकडून हायरिस्क अलर्ट जारी केला आहे.

Coronavirus: पुण्यातील 607 गावांमध्ये आठवडाभरात एकही रुग्ण नाही, 42 गावांमध्ये हायरिस्क अलर्ट
कोरोना
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 12:23 PM

पुणे: कोरोना निर्बंधांच्या तिसऱ्या टप्प्यात असणाऱ्या पुण्यातील ग्रामीण भागात सध्या संमिश्र परिस्थिती पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील 607 गावांमध्ये गेल्या आठवडाभरामध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. परंतु, 194 गावांमध्ये अजूनही दररोज कोरोनाचे नवे रुग्ण सापडत आहेत. तर 42 गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या इतकी वाढली आहे की याठिकाणी प्रशासनाकडून हायरिस्क अलर्ट जारी केला आहे.

भोर, वेल्हा आणि पुरंदर हे तालुके वगळता अन्य दहा तालुक्यांमध्ये कोरोनाचा धोका कायम असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी हायरिस्क गावांमध्ये कोरोना निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर दुसरीकडे जेजुरीत प्रशासनाकडून साथीच्या आजारांच्या सर्वेक्षण आणि तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे. आरोग्य विभाग, जेजुरी नगरपरिषद अणि ग्रामीण रुग्णालयाकडून हे सर्वेक्षण करण्यात येईल.

जेजुरीत गेल्या दोन महिन्यांपासून चिकनगुनिया आणि डेंग्यूने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर जेजुरी नगरपरिषदेनेही उपाययोजनांचा वेग वाढवला आहे. स्थानिक पातळीवरच उपचार मिळणार असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

बेलसरमध्ये केंद्रीय पथक दाखल

पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात काही दिवसांपूर्वी झिकाचा रुग्ण सापडला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर केंद्र सरकारने पाठवलेले पथक गुरुवारी बेलसर गावात पाहणीसाठी दाखल झाले आहे. गावातील परिस्थितीबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. यावेळी केंद्रीय पथकाकडून सविस्तरपणे सर्व माहिती जाणून घेतली जात आहे. हे पथक आता हा अहवाल केंद्र सरकारला देईल.

झिका विषाणुची लक्षणं कोणती?

झिकाचे पहिले लक्षण म्हणजे ताप येणे, अंगदुखणे, अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे. तसेच ताप आल्यानंतर दरम्यान प्रचंड डोकेदुखी होते, डोळे लाल होणे, अशक्तपणा आणि थकवा हे देखील या झिकाचे प्रमुख लक्षण आहे. मात्र, सुरूवातीला आलेल्या तापावरून झिकाची लागण झाली आहे किंवा नाही, हे निश्चितपणे कळणे थोडे कठीण आहे.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रावर नवं संकट, राज्यात झिका विषाणूचा पहिला रुग्ण, आरोग्य यंत्रणा ॲलर्ट

झिका विषाणूचा धोका वाढला, केरळात एका शहरात 14 रुग्ण, तामिळनाडू सरकार अलर्ट, सीमेवर बंदोबस्त वाढवला

कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका वाढला, पाहा लक्षणं कोणती आणि लागण कशी होते?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.