पुण्यात झोपडपट्टीतील नागरिकांना घराजवळच कोरोना लस मिळणार

Covid vaccine | झोपडपट्टयांमध्ये राहणार्‍या नागरिकांना त्यांच्याच वस्तीमध्ये जाऊन लस देण्यात येईल. शहरात साडेचारशेहून अधिक झोपडपट्टया असून सुमारे आठ लाख नागरिक राहतात.

पुण्यात झोपडपट्टीतील नागरिकांना घराजवळच कोरोना लस मिळणार
कोरोना लसीकरण
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 11:18 AM

पुणे: शहरातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आता पुण्यात लवकरच ‘वस्ती तेथे लसीकरण’ मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे झोपडपट्टीतील रहिवाशांना घराजवळच कोरोना लस मिळेल. ऑनलाईन नोंदणी करून कोरोना लस (Coronavirus Vaccine) घेणे अडचणीचे ठरत असलेल्या झोपडपट्टीवासियांसाठी महापालिकेकडून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी झोपडपट्टयांमध्ये राहणार्‍या नागरिकांना त्यांच्याच वस्तीमध्ये जाऊन लस देण्यात येईल. शहरात साडेचारशेहून अधिक झोपडपट्टया असून सुमारे आठ लाख नागरिक राहतात. (Covid vaccination in Pune)

यापूर्वी ठाण्यातही अशाचप्रकारचा उपक्रम राबवण्यात आला होता. ठाणे शहरातील झोपडपट्टी परिसरात लसीकरण प्रक्रियेला वेग देण्यासाठी आता पालिकेने 4 मोबाईल लसीकरण सेंटर्सची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील झोपडपट्टी तसेच चाळीमध्ये राहणारे नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नये तसेच इतर लसीकरण केंद्रावर ये-जा करणे शक्य नसणाऱ्या नागरिकांना त्यांच्या घराजवळच लस देण्याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शन सुचेनेनुसार ठाणे महापालिकेच्यावतीने 4 कोविड-19 मोबाईल लसीकरण सेंटर्स सुरू करण्यात आली होती. या कोविड-19 मोबाईल लसीकरण सेंटरमध्ये 1 वैद्यकीय अधिकारी, 1 व्हॅक्सिनेटर, 2डेटा ऑपरेटर, आणि एका निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती. शहरातील झोपडपट्टी परिसरासोबत इतर विविध ठिकाणी दररोज दुपारी 11 ते 3 या वेळेत नागरिकांना त्यांच्या घराजवळ पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. ही मोबाईल लसीकरण केंद्रे दररोज वेगवेगळ्या भागांत फिरतील.

संबंधित बातम्या 

टीव्ही 9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, औरंगाबादेत लसीकरणासाठी नागरिकांना टोकनचे वाटप

लसीसाठी सोशल डिस्टन्स ठेवून चप्पल रांगेत, औरंगाबादकरांची शक्कल, स्वत: सावलीत घोळका

मुंबई महानगरपालिकेची सरस कामगिरी; 35 दिवसांत उभारलं 2170 बेड्सचं अत्याधुनिक हॉस्पिटल

(Covid vaccination in Pune)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.