पुण्यातील लसीकरणाचा वेग वाढला, जून महिन्यात सर्वाधिक लसीकरण

Coronavirus in Pune | जानेवारी ते मे अखेरपर्यंत शहरातील लसीकरण अडखळत सुरू होते. त्यामुळे 10 लाख लसींचा टप्पा गाठण्यासाठी 28 मे पर्यंतची वाट पहावी लागली होती.

पुण्यातील लसीकरणाचा वेग वाढला, जून महिन्यात सर्वाधिक लसीकरण
कोरोना लसीकरण
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 8:22 AM

पुणे: गेल्या सहा महिन्यापासून संथगतीने सुरु असणाऱ्या पुण्यातील लसीकरणाचा वेग जून महिन्यात वाढल्याचे दिसून आले आहे. जून महिन्यात 7लाख 33 हजार 82 जणांचे लसीकरण (Vaccination) करण्यात आले. यामध्ये 18 वर्षांपुढील नागरिकांचा समावेश आहे. (Covid 19 Vacciantion in Pune)

जून महिन्यात झालेले लसीकरण हे पुण्यात आतापर्यंत एकाच महिन्यात झालेले सर्वाधिक लसीकरण आहे. जानेवारी ते मे अखेरपर्यंत शहरातील लसीकरण अडखळत सुरू होते. त्यामुळे 10 लाख लसींचा टप्पा गाठण्यासाठी 28 मे पर्यंतची वाट पहावी लागली होती. 2 जुलैपर्यंत शहरात 18 लाख 13 हजार 516 जणांनी लस घेतली आहे, अजूनही शहरासाठी 46 लाख डोसची आवश्‍यकता आहे.

आगामी काळात लसीकरणाचा वेग आणखी वाढवण्याची रणनीती पुणे महानगरपालिकेने आखली आहे. कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता असलेल्या व्यापाऱ्यांना दुकानात जाऊन लस देण्यात येईल.महापालिकेच्या वतीने लक्ष्मी रस्त्यावरील व्यापार्‍यांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम गुरुवारपासून लसीच्या (Coronavirus Vaccine) उपलब्धतेनुसार राबविली जाईल, अशी माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली. याशिवाय सध्या पुणे महानगरपालिकेकडून दिव्यांग, रस्त्यांवरील नागरिक, झोपडपट्ट्यांमधील नागरिकांचे लसीकरण सुरु असल्याचेही अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडमध्ये 81 टक्के लोकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज

काही दिवसांपूर्वी कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या पुणे जिल्ह्यातील कोरोना (Coroanvirus) परिस्थिती दिवसेंदिवस वेगाने सुधारताना दिसत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात नुकत्याच करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणात (sero survey) 81 टक्के लोकांना कोरोनाची लागण होऊन गेल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या नागरिकांमध्ये आता कोरोनाच्या अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत.

सिरो सर्वेक्षणासाठी पिंपरी-चिंचवडमधील 10 हजार नागरिकांचे नमुने घेण्यात आले होते. यापैकी 8207 नागरिकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज आढळून आल्या. हे प्रमाण 81.40 टक्के इतके आहे. गावठाण भागात सर्वाधिक म्हणजेच 84.5 टक्के लोकांना कोरोना होऊन गेला आहे. तर 1 हजार 875 नागरिकांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असून त्याचे प्रमाण 18.6 टक्के आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर संस्था आणि वैद्यकीय विभागाकडून हे सिरो सर्वेक्षण करण्यात आले होते.

संबंधित बातम्या : 

पुण्याच्या ‘या’ भागातील 81 टक्के लोकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज; सिरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष

लसीकरणात महाराष्ट्राची रेकॉर्डब्रेक कामगिरी सुरुच, दिवसभरात आठ लाख नागरिकांचे लसीकरण

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्ययंत्रणा बळकट करा, अजित पवारांचे निर्देश

(Covid 19 Vacciantion in Pune)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.