बारामतीचे चुलते – पुतणे चोरटे, गोपीचंद पडळकर यांची टीका, असं का म्हणाले?

५० वर्षे तुम्ही राज्य केलात. कुणालाही चाळीस वर्ष दिलं तर तो जिल्ह्याचा विकास करेल. यांनी फक्त बारामतीचाच विकास केला.

बारामतीचे चुलते - पुतणे चोरटे, गोपीचंद पडळकर यांची टीका, असं का म्हणाले?
गोपीचंद पडळकर
Follow us
| Updated on: Jan 09, 2023 | 8:02 PM

नाशिक : आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. बारामतीचे चुलते, पुतणे चोरटे. दिवसा दरोडे टाकतात. शरद पवार यांनी ५० वर्षे राज्य केलं. पण, विकास केला नाही. असा गंभीर आरोप पडळकर यांनी केलाय. शरद पवार हे जाणता राजा नाही, तर नेमता राजा आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. काका-पुतण्याची एकच टोळी राज्यात उपलब्ध आहे. दुसरी टोळीत उपलब्ध नाही,असंही ते म्हणाले.

मी असं का म्हटलं, कारण इथं बिबट्याचा विषय आहे. सरकारचा निधी कुठं गेला पाहिजे. सिन्नरला यायला पाहिजे. येथे बिबट्याचा प्रादुर्भाव आहे. सिरूर बाजूला दुसरा तालुका आहे. तिथं निधी यायला पाहिजे. तिथंही बिबट्याचा त्रास होतो.

यांनी पैसे कुठं नेले. एक हजार कोटी बारामतीला. तिथं एकही बिबट्या नाही. मग, ही चोरी नाही तर काय, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केलाय.

तुम्ही एक हजार कोटी राज्य सरकारचे नेता. तुमच्याकडं तिजोरी दिली आहे. ती गडप करू नका. ती राज्याची तिजोरी आहे. तुमच्याकडं एका विश्वासानं राज्यानं दिली.

५० वर्षे तुम्ही राज्य केलात. कुणालाही चाळीस वर्ष दिलं तर तो जिल्ह्याचा विकास करेल. यांनी फक्त बारामतीचाच विकास केला.

५० वर्षे राज्य त्यांनी केलं. का त्यांना रस्ता करता आला नाही. आपलं सरकार आल्यानंतर रस्ता दिला. केंद्र आणि राज्य सरकार नव्हतं का. सगळं होतं पण, यांची नियत साफ नव्हती, असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी केला.

यांच्याकडं दुरदृष्टी नव्हती. यांच्याकडं कल्पकता नव्हती. गाव, वाड्या यांचा विकास व्हावा, अशी दृष्टी नव्हती. यांना फक्त या महाराष्ट्रातल्या लोकांचं रक्त शोषायचं होतं, अशी जहरी टीकाही पडळकर यांनी केली.

अरे जाणता राजा हा कुठला जाणता राजा आहे. हा नेमता राजा आहे. यांनी या महाराष्ट्रातल्या कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.