कोरोनाची तिसरी लाट कधी येणार?; सतेज पाटील यांनी केलं मोठं विधान!

पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत मोठं विधान केलं आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचं सतेज पाटील यांनी आज स्पष्ट केलं. (COVID-19 third wave could hit Maharashtra by October, says satej patil)

कोरोनाची तिसरी लाट कधी येणार?; सतेज पाटील यांनी केलं मोठं विधान!
सतेज पाटील, गृहराज्यमंत्री
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 2:47 PM

कोल्हापूर: पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत मोठं विधान केलं आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचं सतेज पाटील यांनी आज स्पष्ट केलं. या लाटेचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज असल्याचंही त्यांनी सांगितलं. (COVID-19 third wave could hit Maharashtra by October, says satej patil)

सतेज पाटील यानी टीव्ही 9 मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मागच्या वेळी जिल्ह्यात सर्वाधिक 19 हजार रुग्ण होते. यावेळी 29 हजार रुग्ण गृहीत धरून तयारी करण्ता आली आहे. 12 तालुक्यात लवकरच ऑक्सिजन प्लांट सुरू होणार आहे. जिल्ह्यात 80 टक्के लसीकरण झालं आहे, असं सांगतानाच ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची लाट येईल, असं पाटील म्हणाले.

लसीकरणासाठी शंखनाद करा

यावेळी त्यांनी भाजपच्या मंदिर आंदोलनावरही टीका केली. भाजपने 100 टक्के लसीकरण मिळावं यासाठी शंखनाद आंदोलन करावं. आंदोलनापेक्षा केंद्राकडून जास्तीत जास्त लसीकरण मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, असा टोला त्यांनी लगावला.

गोकुळ सभासदांच्या मालकीचा

मुरलीधर जाधव यांनी संयम बाळगावा त्यांचा योग्य सन्मान होईल. आपल्याच जिल्ह्यातील संस्थेला बदनाम करू नका. 33 वर्षानंतर सभासदांच्या मालकीचा गोकुळ झाला आहे. मी स्वतः आपल्याला भेटून मार्ग काढेन, असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

शेट्टींना फोन करणार

यावेळी त्यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या आंदोलनावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. एसडीआरच्या नियमानुसार मदत दिली जात आहे. ज्यादा मदतीबाबत लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होईल. त्यांनी टोकाचा निर्णय घेऊ नये. लोकांच्या प्रश्नासाठी आंदोलन करत आहेत. लवकर मदत मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे. ते महाविकास आघाडीपासून लांब जातील असं सध्या तरी वाटत नाही. मी स्वतः फोन करून जलसमाधी आंदोलन टाळण्या बाबत आवाहन करेन, असं त्यांनी स्पष्ट केलं.

गावांनी निर्णय घ्यावा

गावांच्या हद्द वाढीबाबतही त्यांनी शासनाची भूमिका मांडली. संबंधित गावानं विश्वासात घेऊन निर्णय घेतला पाहिजे. मागच्या सरकारने या गावांची फसवणूक केली. प्राधिकरण करून 500 कोटी देतो म्हणाले. प्राधिकरण केलं पण 500 कोटी दिले नाहीत, अशी टीका त्यांनी केली. (COVID-19 third wave could hit Maharashtra by October, says satej patil)

संबंधित बातम्या:

आता परमेश्वर तरी मदतीला येतो का? हे ते पाहत आहेत; हसन मुश्रीफांचा भाजपला खोचक टोला

दहा दिवस ना मोबाईल, ना ई मेल, ना भेटीगाठी, अरविंद केजरीवालांचा नेमका प्लॅन काय?

ED Raid : आधी अनिल परबांना नोटीस, आता ईडीकडून भावना गवळींच्या 5 ठिकाणांवर धाडी

(COVID-19 third wave could hit Maharashtra by October, says satej patil)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.