पुण्यातील खळबळजनक बातमी! कसबा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी थेट पैशांची मागणी

पुण्यात सध्या कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या (Kasba Peth By-election) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुण्यातील खळबळजनक बातमी! कसबा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी थेट पैशांची मागणी
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 7:54 PM

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आलीय. पुण्यात सध्या कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या (Kasba Peth By-election) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय. या निवडणुकीत उमेदवारी नेमकी कुणाला द्यायची या विचारावरुन प्रत्येक पक्षात सध्या खलबतं सुरु आहेत. असं असताना दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे चिरंजीव कुणाल टिळक (Kunal Tilak) यांना एक फोन गेला. कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी आपल्या तिकीट देण्याचं निश्चित झालंय. त्या मोबदल्यात पैसे पाठवा, अशी मागणी या कॉलमधून करण्यात आलीय. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. कुणाल टिळक यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कसबा विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर सगळ्या पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यात भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांचे नाव देखील चर्चेत आहे.

हे सुद्धा वाचा

काही दिवसांपूर्वी कुणाल टिळक यांना एका अनोळखी इसमाने मोबाईल वर फोन करून “मी दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून बोलतो आहे”, असं सांगितलं. यानंतर त्या अनोळखी इसमाने कुणाल यांना “तुमचे आगामी कसबा विधानसभा पोटनिवडणुकइसाठी तिकीट निश्चित झाले आहे”, असे देखील सांगितले.

“तिकीट निश्चित झाल्यामुळे तुम्ही यु पी आय ने या नंबरवर 76 हजार रुपये पाठवा” असे देखील सांगितले.

मात्र कुणाल यांनी त्या व्यक्तीला कुठलीच दाद दिली नाही आणि हा सगळा प्रकार त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पक्षाला कळवला.

यामुळे एकीकडे कसबा पोटनिवडणुकीसाठी सगळ्या पक्षाने तयारी केली असली तरी अशा फोन कॉल किंवा email, मेसेज पासून सावध राहण्याची गरज असल्याचं स्पष्ट होतंय.

देशात सायबर गुन्हेगारांचा सुळसुळाट

राज्यासह देशभरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट बघायला मिळतोय. वेगवेगळ्या माध्यमातून सर्वसामान्यांना लुबाडण्याचं काम सुरु आहे. कधी बँकेतून बोलत असल्याची खोटी माहिती देवून एटीएमचा पीन विचारला जातो, तर कधी वैयक्तिक माहिती विचारून आर्थिक फसवणूक केली जाते. संबंधित प्रकार हे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

पुण्यात याआधीदेखील सायबर क्राईमच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सायबर क्राईम करणारे गुन्हेगार वेगवेगळ्या क्लृप्त्यांचा वापर करुन अनेकांकडून पैसे हडपण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये त्यांना यश देखील येतंय. तर काही ठिकाणी सुजाण नागरिकांमुळे त्यांची डाळ शिजत नाही.

सायबर गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडूनही अनेकदा महत्त्वाच्या सूचना दिल्या जातात. पण तरीही अनेक जण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.