Pune water : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुण्यातल्या धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा!
पुणे : पुणेकरणांसाठी चिंतेची बातमी आहे. पुणेकरांना पाणी (Pune water) जपून वापरावे लागणार आहे. राज्यात सर्वात कमी पाणीसाठी पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये असल्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील प्रमुख धरणे आणि जलाशयांमध्ये सुमारे 41टक्के पाणीसाठा शिल्लक असून पुण्यात धरणांमध्ये (Dams in Pune) यंदा सर्वांत कमी म्हणजे अवघा 35 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दहा टक्क्यांपेक्षा […]
पुणे : पुणेकरणांसाठी चिंतेची बातमी आहे. पुणेकरांना पाणी (Pune water) जपून वापरावे लागणार आहे. राज्यात सर्वात कमी पाणीसाठी पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये असल्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील प्रमुख धरणे आणि जलाशयांमध्ये सुमारे 41टक्के पाणीसाठा शिल्लक असून पुण्यात धरणांमध्ये (Dams in Pune) यंदा सर्वांत कमी म्हणजे अवघा 35 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दहा टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा (Lowest water storage) राहिलेल्या आठ धरणांपैकी चार धरणे पुण्यातील असल्याचीही माहिती मिळत आहे. तर शून्य टक्के पाणीसाठा असलेल्या धरणांमध्ये पुण्यातील नाझरे या धरणाची नोंद करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून आधीच पुण्यात पाण्याची टंचाई आहे. त्यात आता ही बातमी समोर आली आहे. सध्या पुण्यातलं वातावरण ढगाळ आहे. मात्र मागील काही दिवसांतील उष्णतेमुळे पाण्याची मागणीही वाढली होती. आता धरणांमधील पाणीसाठी कमी असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रकल्पांची स्थिती काय?
पुणे जिल्ह्यात सध्या मोठे पाणी प्रकल्प पाहता प्रकल्पीय एकूण पाणीसाठी 15394.75 द.ल.घ.मी. असून आजचा पाणीसाठा हा 6981.66 द.ल.घ.मी. इतका आहे. त्याची टक्केवारी ही 32.42 आहे. मागील वर्षी टक्केवारी 29 होती. इतर विभागांचा विचार करता ती सर्वात कमी आहे. मध्यम प्रकल्पांचा विचार करता एकूण पाणीसाठा 1459.92 द.ल.घ.मी. असून आजचा पाणीसाठी हा 733.22 द.ल.घ.मी. इतका आहे. तर लघु प्रकल्पांमध्ये एकूण पाणीसाठा 1494.63 द.ल.घ.मी. असून आजचा पाणीसाठा 632.21 द.ल.घ.मी. इतका आहे.
बहुतेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा
पुणे महानगरपालिकेच्या विलीन झालेल्या भागातील बहुतांश सोसायट्या पाण्यासाठी टँकर मागवतात. त्यासाठीही त्यांना जादा पैसे मोजावे लागतात. त्यामुळे तेही पाणीटंचाईच्या झळा सोसत आहे. मान्सूनच्या आगमनानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेसा पाणीसाठा असल्याची पाटबंधारे विभागाने सांगितले होते. तर पाटबंधारे विभागाकडून पाणीकपातीची कोणतीही योजना नाही, अशीही दिलासादायक माहिती देण्यात आली होती, तरी अनेक सोसायट्या आणि परिसरात पाण्याची टंचाई दिसून येत आहे. तर मान्सून लांबल्यास पाण्याची अधिक समस्या पुण्यात निर्माण होऊ शकते.
पुणेकरांची नाराजी
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 2021पेक्षा कमी पाणी नोंदवले गेले आहे. आता तर राज्यातील इतर विभागांपेक्षा पुणे विभागातील पाणीसाठा सर्वात कमी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणेकर नाराज आहेत. मागील काही दिवसांपासून ते पाणीटंचाईचा सामना करत आहेत. त्यांच्या मते, महापालिकेतील गैरव्यवस्थापन याला कारणीभूत आहे. त्यामुळे पुरेसा पाणीपुरवठा करण्यात अपयश आल्याने प्रचंड नाराजी नागरिकांत पसरली असून लोक त्रस्त झाले आहेत. बाहेरून पाणी आणावे लागत असल्याने अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.