जल्लोष, उत्साह आणि अप्रतिम नृत्याविष्कार… डान्स डायनामाइट सीझन 2 – ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलमध्ये थाटात संपन्न
ग्रँड फिनाले ही एक अशी यात्रा होती, जी ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलच्या शाखांमध्ये घेतलेल्या ऑडिशन्सपासून सुरू झाली आणि झोनल स्पर्धांमधून सर्वोत्तम सहभागी निवडले गेले.
पुणे, 5 जानेवारी 2025 : संपूर्ण मंच सजला होता, प्रेक्षकांनी संपूर्ण परिसर फुलून गेला होता, प्रचंड उत्साह आणि जल्लोशातच डान्स डायनामाइटचा सीझन पार पडला. डान्स डायनामाइट सीझन 2 आज ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूल, हिंजवडी कॅम्पस, पुणे येथे अत्यंत दिमाखात पार पडला. या भव्यदिव्य कार्यक्रमात संपूर्ण देशातून 200 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या अप्रतिम कौशल्याचे प्रदर्शन करत हा कार्यक्रम अविस्मरणीय बनवला. ग्रँड फिनालेमध्ये जोरदार नृत्य स्पर्धा, विविध कार्यक्रम आणि देशातील काही उत्कृष्ट युवा नर्तकांचे शानदार प्रदर्शन पाहायला मिळाले. या ग्रँड फिनालेमध्ये 1,000 हून अधिक प्रेक्षक सहभागी झाले होते. यात पालक, मित्र मंडळी आणि नृत्य प्रेमींचा समावेश होता. या सर्वांनी हा आगळावेगळा दिमाखादार सोहळा अनुभवला.
ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूल आणि देशभरातील विविध शाळांमधील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. ही स्पर्धा तीन मुख्य गटांमध्ये विभागली होती: सब-ज्युनियर (ग्रेड 1-3), ज्युनियर (ग्रेड 4-7), आणि सीनियर (ग्रेड 8-10). स्पर्धकांनी सोलो आणि समूह नृत्याचे प्रदर्शन केले. ज्यामध्ये सोलो नृत्य 1 मिनिट 30 सेकंदात पूर्ण करण्यास दिले गेले होते. 4 ते 12 डान्सरच्या समूह नृत्यासाठी 3 मिनिट 30 सेकंद दिले गेले.
सदर स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध कोरियोग्राफर वैभव घुगे यांच्या टीमने केले. या टीममध्ये नेहुल वारुळे, राज शिरगावकर आणि समिक्षा घुमे यांचा समावेश होता. वैभव घुगे, ज्यांचे कोरियोग्राफी कौशल्य अप्रतिम आहे, त्यांनी आपल्या कौशल्याचा वापर करून स्पर्धेत भाग घेणाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करत त्यांच्यात जोश भरला. त्यांची उपस्थिती आणि मार्गदर्शन युवा नर्तकांसाठी प्रेरणा स्रोत ठरली आणि त्यांना नृत्याच्या कलेत उत्कृष्टता साधण्याच्या दिशेने प्रेरित केले.
यावेळी वैभव घुगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हे युवा नर्तक जेव्हा आपल्या कामात इतकी मेहनत आणि समर्पण दाखवतात, तेव्हा ते खूपच प्रेरणादायक ठरते. नृत्य म्हणजे फक्त शारीरिक हालचाली नसून, ती एक शक्तिशाली कथा सांगण्याची आणि इतरांशी जोडण्याची एक अद्वितीय पद्धत आहे. आज जी ऊर्जा आणि सृजनशीलता पाहिली, त्याने या नर्तकांच्या अपार क्षमता पुन्हा एकदा दाखवून दिल्या आहेत. मला डान्स डायनामाइटच्या ग्रँड फिनालेचा भाग होण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो आणि या युवा नर्तकांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो, असं वैभव घुगे म्हणाले.
पुण्याच्या हिंजवडी येथील ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या, श्रीमती अश्विनी मन्नारे यांनीही कार्यक्रमाबद्दल आपले विचार व्यक्त केले. ऑर्चिड्समध्ये, आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यावर विश्वास ठेवतो आणि त्यांना अशा प्रकारच्या शालेय आणि अतिरिक्त शैक्षणिक कार्यक्रमांसाठी संधी देतो. डान्स डायनामाइट हा एक उपक्रम आहे जो नृत्य कला केवळ साजरी करत नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, कार्यसंघ आणि शिस्त वाढवतो. असा रंगतदार कार्यक्रम आयोजित करताना आम्हाला आनंद होतोय. या कार्यक्रमातून युवा नर्तकांना आपली कला प्रदर्शित करण्याची आणि त्याच्याशी समान आवड असलेल्या इतरांसोबत जोडण्याची संधी मिळत आहे, असं प्राचार्या अश्विनी मन्नारे म्हणाल्या.
ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलच्या उपाध्यक्ष, शैक्षणिक विभाग डॉ. माधुरी सागले म्हणाल्या की, “डान्स डायनामाइट हा आमच्या विद्यार्थ्यांची सृजनशीलता आणि उत्कृष्टतेचा पुरावा आहे. यामध्ये केवळ स्पर्धा नाही, तर आत्म-प्रदर्शन आणि सहकार्याचे महत्त्व शिकवले जाते. आम्हाला सर्व सहभागी विद्यार्थ्यांवर आणि या कार्यक्रमाच्या यशस्वीतेत सहभागी असलेल्या सर्वांचा अभिमान आहे. ऑर्चिड्समध्ये, आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनिवडी शोधण्यासाठी संधी देण्यावर विश्वास ठेवतो, आणि हा कार्यक्रम त्याच्याच यशाचं एक उत्तम उदाहरण ठरलं आहे.”
पुणे झोनल हेड, ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूल, दीप्ती संजय पवार यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, “डान्स डायनामाइट सीझन 2 मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन पाहून खूप आनंद झाला. या युवा नर्तकांनी दाखवलेली ऊर्जा आणि समर्पण खूपच प्रेरणादायक आहे. ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलमध्ये, आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहोत आणि डान्स डायनामाइट सारख्या कार्यक्रमामुळे त्यांना त्यांचा टॅलेंट दाखवण्याचा उत्तम मंच मिळतो. आम्ही सर्जनशीलता आणि एकतेला प्रोत्साहन देणाऱ्या या अद्भुत उपक्रमाचा समर्थन करतो.”
ग्रँड फिनाले ही एक अशी यात्रा होती, जी ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलच्या शाखांमध्ये घेतलेल्या ऑडिशन्सपासून सुरू झाली आणि झोनल स्पर्धांमधून सर्वोत्तम सहभागी निवडले गेले. अंतिम 212 सहभागी, जे या कठोर प्रक्रियेद्वारे पात्र झाले होते, त्यांनी अप्रतिम नृत्य प्रदर्शन केले आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूल नेहमीच विद्यार्थ्यांच्या टॅलेंटला फुलवण्यासाठी समर्पित राहते, केवळ शैक्षणिकदृष्ट्या नाही, तर क्रीडा आणि कला क्षेत्रांमध्येही संधी प्रदान करते.