“मागं झालं ते झालं, मग आता त्यांना कुठं काय अश्लील दिसतं काय माहिती”; अश्लिलतेवर गौतमी पाटीलन आपली भूमिकाच मांडली…

मागील कार्यक्रमात माझ्याकडून चूक झाली आहे पण त्यानंतर त्या गोष्टी टाळत आले असल्याचे सांगत लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील यांनी महाराष्ट्राची माफी मागितली आहे.

मागं झालं ते झालं, मग आता त्यांना कुठं काय अश्लील दिसतं काय माहिती; अश्लिलतेवर गौतमी पाटीलन आपली भूमिकाच मांडली...
Follow us
| Updated on: Dec 28, 2022 | 10:51 PM

पुणेः लावणी नृत्यंगणा गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी होत असतानाच दुसरीकडून मात्र त्यांना संरक्षण देण्याची मागणी होऊ लागली आहे. गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमावर अश्लिलतेचा आरोप ठेऊन प्रस्थापित कलाकारांकडून विरोध आणि बंदीची मागणी होत असताना गौतमी पाटील यांनी टीव्ही नाईनशी बोलताना आपली स्पष्ट भूमिकाच मांडली.

गौतमी पाटील यांनी आपल्या कार्यक्रमावर अश्लिलतेचा आरोप केला जात आहे. मात्र तो आरोप का केला जात आहे याची मला खरचं माहिती नाही असंही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी तमाम महाराष्ट्राची माफी मागून सांगितले की, मागे जे कार्यक्रम झाले त्यामध्ये माझी चूक झाली होती. पण त्यानंतर आपल्या कार्यक्रमामध्ये अश्लिलतेची चूक मी केली नाही असंही त्यांनी स्पष्ट सांगितले.

माझ्या कार्यक्रमामध्ये अनेक कलाकार ज्येष्ठ आणि मोठे कलाकार लावणीवर कार्यक्रम करतात. मात्र मागील कार्यक्रमात जी चूक माझ्याकडून झाली होती. ती चूक मी पुन्हा केली नाही.

तरीही आता माझ्या कार्यक्रमावर बंदी आणण्याची मागणी लोकांकडून आणि कलाकारांकडून का केली जाते आहे ते आपल्याला माहिती नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमांना ज्या प्रमाणे विरोध होतो. त्याच प्रमाणे सोशल मीडियावरून मात्र त्यांच्या समर्थनाथ अनेक यूजर्स उतरले आहेत. सोशल मीडियावरून ज्या प्रमाणे त्यांच्या संरक्षणाची मागणी केली जात आहे.

त्याच प्रमाणे सांगलीमध्ये दलित महासंघाच्यावतीने गौतमी पाटील यांना संरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करण्यात आले आहे. त्याचमुळे गौतमी पाटील यांनी सांगितले की, ज्या प्रमाणे माझ्या नावाला आणि कार्यक्रमाला जसा विरोध होतो तसेच समर्थनही मोठे मिळत आहे असंही त्यांनी म्हटले आहे.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.