Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या रक्तातच मुस्लीम बांधवांविषयी विष, जनतेनं त्यांना जाब विचारावा: दत्तात्रय भरणे

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे कधीच कोणत्या पक्षावर डायरेक्ट टीका करताना दिसून आलेले नाही. मात्र, त्यांनी आज भाजपवर जहरी टीका केलीय.

भाजपच्या रक्तातच मुस्लीम बांधवांविषयी विष, जनतेनं त्यांना जाब विचारावा: दत्तात्रय भरणे
दत्तात्रय भरणे
Follow us
| Updated on: Nov 20, 2021 | 6:18 PM

पुणे (इंदापूर): राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे कधीच कोणत्या पक्षावर डायरेक्ट टीका करताना दिसून आलेले नाही. मात्र, त्यांनी आज भाजपवर जहरी टीका केलीय. दत्तात्रय भरणे यांनी भाजप पक्ष हा जातीयवादी पक्ष असल्याची टीका केली आहे. भाजप पक्ष जातीय वादी पक्ष असून त्यांच्या रक्तातच मुस्लीम बांधवांबद्दल विष आहे. जातीयवादी भाजप पक्षाला आपण जाब विचारला पाहिजे, असे म्हणत दत्तात्रय भरणे यांनी भाजपवर कडकडून टीका केली आहे.

दत्तात्रय भरणे नेमकं काय म्हणाले

” काही पक्ष जातीपातीच धर्माचं वेगळ्या प्रकारे विष पेरतात. मुस्लीम बांधवांवर खोटे आरोप करतात. काही मंडळी व काही पक्षांचे प्रमुख हे त्यांवर ठपका ठेवतात. शेवटी मुस्लीम असो वा हिंदू रक्त एकच आहे. आपण इंदापूर तालुक्यामध्ये हिंदू-मुस्लीम कधी मानत नाही. एकमेकांवर भावाप्रमाणे प्रेम करतो. परंतु काही पक्षांचे मंडळी मतांच्यासाठी हिंदू आणि मुस्लिम करतात, असं दत्तात्रय भरणे म्हणाले.

भाजपला जाब विचारायला हवा

जे आजचे दंगे चालले आहेत त्यामागे मोठे षड्यंत्र आहे. मुंबईमध्ये काही गोष्टी चालल्या आहेत. कुठेतरी एका कुटुंबाला विशिष्ट आडनाव असल्याकारणाने टार्गेट केलं जातं, याचा कुठेतरी विचार केला पाहिजे. ज्यांच्या रक्तातच किंवा त्यांच्या मेंदू मध्येच मुस्लीम बांधवांबद्दल विष आहे अशा भाजप सारख्या जातीयवादी पक्षाला आपण जाब विचारला पाहिजे, असं दत्तात्रय भरणे म्हणाले. मतासाठी ही काही पक्षांची मंडळी विष पेरून मन कुलषित करून दंगे घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यापासून आपण सावध राहिले पाहिजे, असं राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय.

इंदापूर शहरातील पालखी महामार्गावर शिल्पांचा लोकार्पण सोहळा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. कै.अजित ढवळे-पवार पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यमंत्री भरणे बोलत होते.

इतर बातम्या:

VIDEO: ‘बिरोबाच्या नावानं चांगभलं…’ आझाद मैदान दुमदुमले, कोणत्याही परिस्थितीत परबांच्या बंगल्यावर धडक देणारच; एसटी कामगार इरेला पेटले

इम्रान खान यांना ‘बडे भाई’ म्हटल्याने सिद्धू अडचणीत, स्पष्टीकरणात म्हणाले, हा मूळ मुद्द्यावरून भटकवण्याचा प्रकार!

Dattatray Bharane slam BJP stand over Muslim Community

आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला.
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा.
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला.
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी.
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.