देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राहुल कुल यांच्या मंत्रिपदाचे संकेत; म्हणाले, दौंडकरांनो…

Devendra Fadnavis on Rahul Kool : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दौंडमध्ये सभा झाली. या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राहुल कुल यांच्या मंत्रिपदाचे संकेत दिले आहेत. दौंडकरांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. वाचा सविस्तर...

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राहुल कुल यांच्या मंत्रिपदाचे संकेत; म्हणाले, दौंडकरांनो...
राहुल कुल, देवेंद्र फडणवीस Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 2:07 PM

विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये आहेत. दौंड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांची वरवंड गावात सभा झाली. या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राहुल कुल यांच्या कामाचं कौतुक केलं. राहुल कुल यांच्या मंत्रिपदाचे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दौंडच्या जनतेला संबोधित करताना तुम्ही मला आमदार द्या, मी तुम्हाला मंत्री देतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राहुल कुल यांच्या मंत्रिपदाचे संकेत

23 तारखेला राहुल कुल नवीन रेकॉर्ड करणार आहेत. कचा-कच बटन दाबून राहुल कुल कांचन कुल यांना लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट द्या. माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही जुने सगळे रेकॉर्ड मोडणार आहेत. मी ठरवलं आहे. यावेळी राहुल कुल यांना मंत्री करणार आहे. पण माझी अट आहे. 20 हजार पेक्षा कमी मताधिक्याने निवडून दिलं तर राज्यमंत्रिपद देणार. 20 हजार पेक्षा जास्त मताधिक्य दिले तर कॅबिनेट मंत्री देणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

दौंडमध्ये बोलताना फडणवीस काय म्हणाले?

महायुतीचं सरकार आलं की मुळशीचे पाणी या भागाला मिळणार आहे. भीमा पाटस कारखाना अडचणीत होता आता चांगला सुरू झालाय. माझे केस कमी झाले ते राहुल कुल यांच्यामुळेच… रोज कारखान्याविषयी सांगायचे. मोदींनी 10 हजार कोटी रुपयांचा इनकम टॅक्स कमी केला. उसाचे भाजपला काय समजते असं म्हणत होते नाकावर टिचून काम करतोय, असं देवेंद्र फडणवीस दौंडमध्ये बोलताना म्हणाले.

आमचे सरकार आले तर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू. अडीच कोटी महिलांकब्या खात्यात पैसे पाठवले. आम्ही सख्खे भाऊ तुमच्यासाठी पैसे देतोय. पण काही सावत्र भाऊ मार्केटमध्ये फिरत आहेत. ते ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले. पण आम्ही थांबणार नाही. सरकार आल्यावर 2100 रुपये महिलांना देणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

राहुल कुल काय म्हणाले?

राहुल कुल यांच्या प्रचारार्थ दौंडमधील वरवंड गावात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. यावेळी राहुल कुल यांनीही संबोधित केलं. अनेक दौंड तालुक्यातील अनेक प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत मार्गी लावले. आम्ही चांगला दृष्टिकोन आणि व्हिजन घेऊन काम करीत आहोत. पुरंदर विमानतळ जवळ होत असल्याने दौंडला देखील फायदा होणार आहे. शेतकरी वर्गाचे देखील अनेक धोरणे आणली गेले आहेत. महायुतीचे कामे दाखविल्यानंतर विरोधकांकडे त्याचे उत्तर नसेल. कोरोना काळात अनेक कामे केली गेली. कारखाना सुरू करण्यात अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची मदत झाली. कारखाना सुरू झाला याची पोटदुखी विरोधकांना आहे. शैक्षणिक संकुल येणाऱ्या काळात उभं करण्याचे धोरण आहे, असं राहुल कुल म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.