Pune farmer : विद्युत पंपाच्या स्टार्टर पेटीचा शॉक लागून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, शिरूरमधल्या सविंदणेतली घटना

शिरूर (Shirur) तालुक्यातील सविंदणे येथील बंडू बबुशा नरवडे (वय 45) या शेतकऱ्याचा विद्युत पंपाच्या स्टार्टर पेटीचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू (Dead) झाला आहे. बंडू हे आपल्या शेताला पाणी देण्यासाठी इझिरे पाझर तलावाजवळील मोटार चालू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी स्टार्टर पेटीचा शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Pune farmer : विद्युत पंपाच्या स्टार्टर पेटीचा शॉक लागून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, शिरूरमधल्या सविंदणेतली घटना
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 11:17 AM

शिरूर, पुणे : शिरूर (Shirur) तालुक्यातील सविंदणे येथील बंडू बबुशा नरवडे (वय 45) या शेतकऱ्याचा विद्युत पंपाच्या स्टार्टर पेटीचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू (Dead) झाला आहे. बंडू हे आपल्या शेताला पाणी देण्यासाठी इझिरे पाझर तलावाजवळील मोटार चालू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी स्टार्टर पेटीचा शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी टाकळी हाजी पोस्टचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनिल उगले, पो. कॉ. विशाल पालवे, महावितरणचे कर्मचारी यांनी भेट दिली असून घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास करत आहे. सविंदणे परिसरात पोलवरील तारा जीर्ण झाल्या असून बऱ्याच ठिकाणी त्या लोंबत आहेत. तसेच विद्युत रोहित्रांच्या फ्यूज बॉक्सची दुरवस्था झाली आहे. गावाला वायरमनदेखील उपलब्ध नाही. त्यामुळे धोका पत्करून शेतकऱ्यांना (Farmers) फ्यूज, डिओ टाकावा लागत आहे.

मदत देण्याची मागणी

अनेक समस्यांनी शेतकऱ्यांना घेरले आहे. सातत्याने होणाऱ्या विजेच्या लंपडावामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे आपला जीव गमवावा लागत आहे. या गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबाला महावितरणने तातडीने मदत मिळवून देण्याची मागणी उपसरपंच अभिजित लंघे व ग्रामपंचायत सदस्य भोलेनाथ पडवळ यांनी केली आहे.

आणखी वाचा :

CCTV : लेडिज वेअरमधून हजारोंच्या मालावर चोरट्यानं केला हात साफ; पुण्याच्या तळेगाव दाभाडेतली चोरी सीसीटीव्हीत कैद

Summer camps : दोन वर्षांनंतरचा उन्हाळी शिबिरांचा उत्साह; पुण्यात यंदाच्या शिबिरांत काय आहे खास? वाचा

Pune Rain: बिन मौसम बरसात! पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार! अनेक ठिकाणी बत्ती गुल, पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत कुठे कुठे हजेरी? वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.