पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्यानंतर अनेक ठिकाणी जंगी कुस्त्यांचं आयोजन होताना दिसत आहे. नव्या दमाची मुलंही व्यायाम करू लागली आहेत. मात्र अशातच पुणे जिल्ह्यामधील मुळशी तालुक्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तालमीत सराव करत असताना पैलवानाचा मृत्यू झाला आहे. तालमीत सपाट्या मारताना मृत्यू झाल्याने मुळशी तालुका हादरून गेला आहे. स्वप्निल पाडाळे असं मृत पैलवानाचं नाव आहे.
रोजच्याप्रमाणे स्वप्निल हा तालमीमध्ये सरावासाठी आला होता. मारुंजी या ठिकाणी तालमीमध्ये तो सराव करत होता. सकाळी 7.30 च्या वेळी तो सपाट्या मारत होता. सपाट्या मारत असताना तो खाली पडला त्यावेळी तालमीमधील इतर मुलांनी त्याला लगोलग रूग्णालयात दाखल केलं. पण त्याचा त्याआधीच मृत्यू झाला होता असं तपालेल्या डॉक्टरांनी सांगितलं. स्वप्निल पाडाळे असं मृत पैलवानाचं नाव आहे.
स्वप्निल याने मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातून कुस्तीचे प्रशिक्षण घेतलं होतं. आता तो नेक ठिकाणी मुलांना कुस्तीचे धडे देत होता. स्वप्निलचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं असल्याचं डॉक्टर म्हणाले. स्वप्निल हा ‘महाराष्ट्र चॅम्पिअन’ होता, कुस्तीपटूच्या मृत्यूने कुस्ती विश्वात शोककळा पसरली आहे.
कुस्तीची पंढरी म्हणून कोल्हापूर प्रसिद्ध आहे. मात्र आता गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील तालमींकडेही नवीन मुले सरावासाठी जात असल्याचं दिसत आहे. नामवंत पैलवान आणि कुस्तीपटूंमुळे हे आकर्षण वाढलेलं आहे. स्वप्निलचा सराव करताना मृत्यू झाल्याने क्रीडा विश्वात चर्चा आहे.
दरम्यान, व्यायाम करण्याआधी प्रत्येकाने मार्गदर्शन घ्यावं, कधीही उठलं सुटलं आणि व्यायाम केला तर त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे व्यायाम करण्याचा वेळ ठरवा आणि रोज शरीराला पुरक इतकाच व्यायाम करा जेणेकरून तुम्हाला त्याचा काही त्रास होणार नाही.