Deepak Kesarkar : काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन दसरा मेळावा करावा, दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

दसरा मेळावा शिंदे गटाचाच होईल, हे माझ्या तोंडून का वदवून घेत आहात, असा प्रतिप्रश्न दीपक केसरकर यांनी केला. यावेळी उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीका केली.

Deepak Kesarkar : काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन दसरा मेळावा करावा, दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 11:47 AM

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) बाळासाहेबांच्या विचारांवर चालतात. बाळासाहेबांच्या प्रथा पंरपरा कायम ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांचा विचार आहे आणि दसरा मेळावा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे दसरा मेळावा घेण्यावर शिंदे गट ठाम आहे, असे मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितले आहे. ते पुण्यात बोलत होते. विभागाच्या आढावा बैठकीसाठी ते आले होते. दसरा मेळावा शिवसेनेचा की शिंदे गटाचा असा वाद सध्या सुरू आहे. त्याचबरोबर ठिकाणावरूनही हा वाद सुरू आहे. दसरा मेळाव्यावर (Dasara Melava) शिंदे गट दावा करत आहे. दीपक केसरकर यांनी याबाबत शिंदे गटाची भूमिका स्पष्ट केली तसेच शिवसेनेवर टीकाही केली आहे. ते म्हणाले, की शिवसेनेने दसरा मेळावा घेतला तर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला स्टेजवर बोलवावे, म्हणजे लोकांना कळेल कोण बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेले आहे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

‘कोर्टाच्या सुनावणीवर मी बोलणार नाही’

सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर मी बोलणार नाही, जे काही होईल ते कायद्याने होणार आहे. प्रकरण न्यायालयात असल्याने त्यावर चर्चा करणेही योग्य होणार नाही, असे ते म्हणाले. दसरा मेळाव्यासंदर्भातील बी प्लॅनविषयी ते म्हणाले, की याविषयीची चर्चा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत झालेली नाही. मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी बाळासाहेबांच्या विचारांवर चालतात. त्यांनी ज्या प्रथा-परंपरा घालून दिल्या आहेत, त्याचे पालन व्हावे, असे त्यांचे नेहमी म्हणणे असते. त्यामुळे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, ते पाहावे लागेल, असे केसरकर म्हणाले.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले दीपक केसरकर?

‘मुंबईत 150 नगरसेवक येणार’

दसरा मेळावा शिंदे गटाचाच होईल, हे माझ्या तोंडून का वदवून घेत आहात, असा प्रतिप्रश्न केसरकर यांनी केला. यावेळी उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीका केली. ज्यांना अजूनही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायचे आहे, त्यांनी दसरा मेळावा त्यांच्यासोबत घ्यावा, असा टोला लगावला आहे. सध्याची संख्या बघितली तर मुंबई महापालिकेत भाजपा आणि आमचे 150 नगरसेवक येणार आहेत, असा दावाही यावेळी केसरकर यांनी केला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.