Deepak Kesarkar : ‘…म्हणून उद्धव ठाकरेंविषयी बोलणं टाळतो’, पुण्यात दीपक केसरकरांनी सांगितलं खरं कारण

विरोधकांकडे सध्या कोणतेही मुद्दे नाहीत, त्यामुळेच ते अशाप्रकारचे वाद निर्माण करत आहेत. तर मंत्रीपदावरूनही आमच्यात कोणीही नाराज नाही, असे पुण्यात आले असता दीपक केसरकर म्हणाले.

Deepak Kesarkar : '...म्हणून उद्धव ठाकरेंविषयी बोलणं टाळतो', पुण्यात दीपक केसरकरांनी सांगितलं खरं कारण
दीपक केसरकरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 1:29 PM

पुणे : कलंकित मंत्री हा आरोप एक वर्षांपूर्वी संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर करण्यात आला होता तो आरोप सिद्ध झाला नाही. एका समाजाचा मंत्रीपद द्यावे म्हणून बंजारा समाजाला दिलेले वचन मुख्यमंत्री यांनी पाळले, असे स्पष्टीकरण शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिले आहे. ते पुण्यात बोलत होते. वादग्रस्त संजय राठोड यांच्या मंत्रीपदावरून सध्या वादंग सुरू आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी संजय राठोड यांची पाठराखण केली आहे. या प्रकरणाची चौकशी अजून सुरू आहे. चित्रा वाघ म्हणत असतील तर चौकशी होईल. तसेच ही चौकशी निःपक्षपातीपणे होईल. परंतु जर दोषी नसतील तर मंत्रीपद का देऊ नये, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविषयी बोलणे टाळत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

‘कोणीही नाराज नाही’

संजय राठोड दोषी आढळले असते तर कारवाई झाली असती. बंजारा समाजाच्या भावना होत्या. त्यामुळेच संजय राठोड यांना मंत्रीपद दिले, असे केसरकर म्हणाले. संजय राठोड यांच्याविषयी मुद्दे उपस्थित केले जात आहेत. यापूर्वीही केले गेले. विरोधकांकडे सध्या कोणतेही मुद्दे नाहीत, त्यामुळेच ते अशाप्रकारचे वाद निर्माण करत आहेत. तर मंत्रीपदावरूनही आमच्यात कोणीही नाराज नाही. आधी म्हणत होते, गेलेले परत येतील, मात्र आमचे संख्याबळ वाढतच आहे. अनेकांची नाराजी होती. ती बाहेर आली. उठाव करायला धैर्य लागते. नाहीतर सर्वच्या सर्वच आले असते. मात्र तसे झाले नाही, असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला.

विरोधकांवर दीपक केसरकरांची टीका

’10 हजार कोटींची वाढ’

मेट्रो प्रकल्पामध्ये 10 हजार कोटींची वाढ झाली आहे. हा बोजा जनतेवर पडत असतो. असे प्रकल्प थांबवून ठेवले तर किंमतीमध्ये वाढ होते. आरे मेट्रोमुळे प्रदुषण वाढणार नसून कमी होणार असल्याचा दावादेखील यावेळी केसरकर यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबतची परवानगी दिली होती. पर्यावरण रक्षण झाले पाहिजे. सर्वसामान्य जनतेसाठी काम केले जात आहे. यावरून

हे सुद्धा वाचा

‘उद्धव ठाकरेंबद्दल काहीच बोलत नाही’

मी उद्धवसाहेब यांच्याबाबत मी काहीच बोलत नाही नि काही बोललो तर टायटल होते, मी उद्धवसाहेब यांच्यावर टीका केली. मला ते नको आहे, म्हणून मी त्यांच्याबाबत बोलणे टाळतो, असेही दीपक केसरकर यावेळी म्हणाले.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.