पुण्यात डेंग्यू आणि चिकनगुनियाचा धोका वाढला
Pune | या आजारांमध्ये ताप, अतिसार, उलट्या होणे, डोकेदुखी आणि सांधेदुखीसारखी लक्षणे दिसून येतात. गेल्या दोन आठवड्यांत या रुग्णांमध्ये सरासरी 7 ते 10 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.
पुणे: गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. अनलॉक झाल्याने लोकांनी रस्त्यावरील खाद्यपदार्थ आणि जंकफूड खायला सुरूवात केल्याने याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पुण्यात डेंग्यू, टायफॉईड, चिकुनगुनिया, कावीळच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. या आजारांमध्ये ताप, अतिसार, उलट्या होणे, डोकेदुखी आणि सांधेदुखीसारखी लक्षणे दिसून येतात. गेल्या दोन आठवड्यांत या रुग्णांमध्ये सरासरी 7 ते 10 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना लशींचा तुटवडा
कोविशिल्ड’चा साठा संपला शहरात आज 11 केंद्रांवर फक्त ‘कोव्हॅक्सिन’ची लस मिळेल. महापालिकेला ‘कोविशिल्ड’ लशीचा पुरेसा साठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे आज फक्त ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा पहिला, दुसरा डोस देण्यात येईल. 18 वर्षांपुढील नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’ची लस दिली जाणार आहे. किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या आणि ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होईल.
झिकाच्या भीतीमुळे बेलसर ग्रामपंचायतने वाटले निरोध
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात झिकाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाने सतर्क होत विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. पुरुषांच्या विर्यात झिकाचे विषाणू आढळत असल्याने गर्भधारणा टाळण्यासाठी व सुरक्षित संभोग व्हावा यासाठी बेलसर गावात पुरुषांना निरोधचे वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या वतीने भोंगागाडीच्या माध्यमातून दारोदारी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. गावात सर्व ठिकाणी धूर फवारणी केली जात आहे.
गावातल्या 24 गरोदर महिलांना मच्छरदाणी आणि डास प्रतिबंधक मलम देण्यात आले आहेत. महिलांच्या रक्ताचे नमुनेही तपासले असून त्यात कोणीही झिका ग्रस्त आढळलेले नाही असे डॉ. भरत शितोळे यांनी सांगितले. गावांमध्ये विविध पद्धतीच्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात असून ग्रामपंचायतच्या वतीने सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचे गावचे उपसरपंच धीरज जगताप यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
पुण्याच्या ग्रामीण भागातील कोरोना निर्बंध शिथील
सीरमचे पुनावाला म्हणतात, राजकारणी थापा मारतायत, मिक्स डोसच्याही विरोधात, वाचा आणखी काय बोलले?