Pune : डेंग्यू अन् चिकुनगुन्याचे रुग्ण वाढले; पुणे महापालिकेनं 758 सोसायट्या आणि व्यावसायिकांना बजावली नोटीस

758 सोसायट्या आणि व्यावसायिक जागांना नोटीस बजावल्या आहेत आणि 23 जुलैपर्यंत 36,400 रुपयांचा दंड वसूल केला आहे. जुलैमधील दंड आतापर्यंतचा सर्वाधिक आहे, असे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

Pune : डेंग्यू अन् चिकुनगुन्याचे रुग्ण वाढले; पुणे महापालिकेनं 758 सोसायट्या आणि व्यावसायिकांना बजावली नोटीस
डासांच्या उत्पत्तीची स्थानेImage Credit source: HT
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 7:30 AM

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या (PMC) आरोग्य विभागाने केवळ जुलै महिन्यातच पुणे आणि आसपासच्या सोसायट्या आणि व्यावसायिक जागा असलेल्या मालकांना डासांच्या उत्पत्तीसाठी 758 नोटीस बजावल्या आहेत. ज्यामुळे शहरात डेंग्यू (Dengue) आणि चिकुनगुन्याच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते. या वर्षी जुलै महिन्यात सर्वाधिक नोटीस बजावल्या गेल्या आहेत. पीएमसी हद्दीत जुलैमध्ये डेंग्यूची 50 पुष्टी झालेल्या केसेस आहेत आणि जुलैमध्ये चिकुनगुन्याचा एकही रुग्ण आढळला नाही, असे आरोग्य विभागाच्या (Health department) अधिकाऱ्यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यात जून अखेरपर्यंत डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र राज्य एपिडेमियोलॉजी विभागानुसार, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात डेंग्यूचे 137 रुग्ण आढळले आहेत तर पीएमसीमध्ये जून 2022 अखेर 141 केसेस नोंदल्या गेल्या आहेत. एकट्या जुलैमध्ये 50 नवीन रुग्ण आढळून आल्याने पुणे महापालिकेमध्ये 23 जुलैपर्यंत डेंग्यूच्या एकूण रुग्णांची संख्या 193वर पोहोचली आहे.

डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ

सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे याप्रकरणी म्हणाले, की आम्ही 758 सोसायट्या आणि व्यावसायिक जागांना नोटीस बजावल्या आहेत आणि 23 जुलैपर्यंत 36,400 रुपयांचा दंड वसूल केला आहे. जुलैमधील दंड आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. निवासी तसेच व्यावसायिक संकुलांभोवती साचलेले पाणी तपासण्यासाठी आणि प्रजनन स्थळांची तपासणी करण्यासाठी पीएमसीने लोकांना अधिसूचना जारी केली आहे.

‘पावसाळ्याच्या आधी उपाययोजना’

राज्य एपिडेमियोलॉजी अधिकारी डॉ. महेंद्र जगताप म्हणाले, की विभागामार्फत डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणांबाबत जनजागृती करण्यासाठी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. आम्ही शहरी आणि ग्रामीण भागासाठी दोन स्वतंत्र कृती आराखडे तयार केले आहेत. कारण दोन्ही क्षेत्रातील आव्हाने खूप भिन्न आहेत. आमच्या गेल्या तीन वर्षांच्या सर्वेक्षणातून आम्ही डेंग्यूच्या प्रसारासाठी हॉटस्पॉट ओळखले आहेत. आम्ही पावसाळ्याच्या अगदी अगोदर उपाययोजना सुरू केली. संशयित रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही रुग्णालयांमध्ये तापाच्या केसेसवर लक्ष ठेवत आहोत, असे जगताप म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे’

या समस्येबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पसरवण्यासाठी आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांसोबत बैठकाही आयोजित केल्या आहेत, असे डॉ जगताप म्हणाले. नागरिकांनी आपल्या घराच्या आत आणि परिसरात जेथे साचलेले पाणी आहे तेथे तपासणी करून ठेवावी. कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले पाहिजे. कारण पाणी साचलेल्या ठिकाणी डासांची पैदास होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.