Pune dengue : पुणेकरांनो सावधान! डेंग्यूचा होतोय फैलाव, डॉक्टरांनी काय सांगितली कारणं? वाचा…

सरकार सहसा रुग्ण वाढू लागल्यानंतरच कारवाई करते. डेंग्यूचा प्रादुर्भाव होण्याचा धोका टाळण्यासाठी खबरदारीच्या पातळीवर काम केले पाहिजे, असे काही जागरूक नागरिकांचे मत आहे. पुणे महानगरपालिकेने या वर्षी घेतलेल्या खबरदारीच्या उपायांबद्दल, पीएमसीच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

Pune dengue : पुणेकरांनो सावधान! डेंग्यूचा होतोय फैलाव, डॉक्टरांनी काय सांगितली कारणं? वाचा...
डेंग्यूचा डास (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 10:52 PM

पुणे : पुण्यात हलक्या सरी सुरू झाल्याने डेंग्यूच्या (Dengue) संशयित रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आरोग्य विभागाने शेअर केलेल्या KRA रिपोर्टनुसार, या महिन्यात आतापर्यंत 86हून अधिक संशयित डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. केईएम रुग्णालयात (KEM Hospital) अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर रुग्ण समोर आले आहेत. शहरात डेंग्यूच्या काही तुरळक केसेस समोर येत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून डेंग्यूचा उद्रेक झालेला नाही. त्याचे स्वरूप चक्रीय असल्याने, जुलैच्या मध्यात उद्रेक होण्याची शक्यता आहे. शिवाय, वारीनंतर (Pandharpur Wari) नारळाच्या शेंड्या आणि वाट्यांमध्ये साचलेले पाणी यामुळे डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता आहे. सध्यातरी पावसाच्या पार्श्वभूमीवर ही चिंता आहे, असे केईएमतर्फे सांगण्यात आले आहे. दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून येतात. एकाच ठिकाणी सात दिवसांपेक्षा जास्त काळ पाणी साचून राहिल्यास ते डेंग्यूच्या डासांची पैदास करण्याचे ठिकाण बनते.

‘उपाययोजना करत आहोत’

सरकार सहसा रुग्ण वाढू लागल्यानंतरच कारवाई करते. डेंग्यूचा प्रादुर्भाव होण्याचा धोका टाळण्यासाठी खबरदारीच्या पातळीवर काम केले पाहिजे, असे काही जागरूक नागरिकांचे मत आहे. पुणे महानगरपालिकेने या वर्षी घेतलेल्या खबरदारीच्या उपायांबद्दल, पीएमसीच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी माहिती दिली. आम्ही भौतिक, रासायनिक आणि जैविक उपाययोजना करत आहोत. आम्ही आउटडोअर फॉगिंग आणि घरांतही फवारणी केली आहे. ज्या ठिकाणी डेंग्यू पसरू शकतो, तेथे आम्ही विशेष उपाययोजना करण्याचे नियोजन आखत आहोत. याशिवाय, रुग्णांच्या वाढीवरही आमचे लक्ष असणार आहे, असे सांगण्यात आले.

पावसामुळे अधिक धोका

घराबाहेर पाणी साचल्यास, खड्डे बुजवण्यासाठी अभियांत्रिकी विभागाची मदत महापालिका घेते. यासोबतच पाण्यातील गाळ आणि घाणीतही डासांची पैदास होते. त्यांची साफसफाई करण्यासाठी ड्रेनेज विभागाची मदत पीएमसी घेते. मुसळधार पावसाने पाणी तुंबण्याची समस्या सतत वाढत आहे. मुसळधार पावसानंतर धोका वाढतो. त्यामुळे पालिकेचे यावर लक्ष असणार आहे.

हे सुद्धा वाचा

नागरिकांनी जागृत राहणे गरजेचे

नियमितपणे पाण्याच्या लाइन्स साफ केल्या आहेत. निवासी भागात ड्रेनेज पाइप अडवल्यामुळे पावसानंतर पाणी साचते. ते पाणी साफ करण्यात येईल, असे ड्रेनेज विभागाने म्हटले आहे. दरम्यान, डेंग्यू आणि इतर आजारांबाबत सोसायट्यांमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचीही महापालिकेची योजना आहे. लोकांनी त्यांच्या भागात पाणी साचणार नाही, स्वच्छता राहील याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....