राजमाता जिजाऊंच्या जयंतीदिनी इचलकरंजीत जन्मलेल्या मुलींच्या नावे 5 हजारांची ठेव, खाटीक समाजाचा स्तुत्य उपक्रम

राजमाता जिजाऊंच्या जयंतीदिनी इचलकरंजीच्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात जन्मास येणार्‍या प्रत्येक मुलीच्या नावे पाच हजार रुपयांची ठेव ठेवली गेली आहे.

राजमाता जिजाऊंच्या जयंतीदिनी इचलकरंजीत जन्मलेल्या मुलींच्या नावे 5 हजारांची ठेव, खाटीक समाजाचा स्तुत्य उपक्रम
Follow us
| Updated on: Jan 13, 2021 | 7:32 PM

इचलकरंजी : शहरात राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधत हिंदू खाटीक मागासवर्गीय समाज इचलकरंजी यांच्यावतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला. जिजाऊ जयंतीदिनी इचलकरंजील्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात जन्मास येणार्‍या प्रत्येक मुलींच्या नावे पाच हजार रुपयांची ठेव ठेवली गेली आहे. (deposit of Rs 5 Thousand in the name of a girl born in Ichalkaranji on the birth anniversary of Rajmata Jijau)

सुसंस्कारीत समाज कायम ठेवायचा असेल तर जिजामाता जन्माला येणे गरजेचे आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातूनच मुलगी नको हे सध्या असलेले चित्र निश्‍चितपणे बदलेल असे मत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण समितीच्या सदस्य अ‌ॅड. दिलशाद मुजावर यांनी व्यक्त केले.

हिंदू खाटीक मागासवर्गीय समाज इचलकरंजी यांच्यावतीने सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. या समाजातील उद्योजक विशाल कांबळे आणि जितेंद्र शेटके यांच्यावतीने दरवर्षी मकर संक्रांतीचे औचित्य साधत वर्षभरात समाजात ज्या मुली जन्माला येतात त्यांच्या नावे एक ठराविक रक्कम ठेव म्हणून ठेवली जाते. हाच उपक्रम समाजाच्यावतीने यंदा राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधत पार पडला. तशा आशयाचे पत्र इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. आर. आर. शेट्ये यांना देण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अ‍ॅड. दिलशाद मुजावर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत मुलीच्या भविष्याची सुरुवात म्हणून ही ठेव मौलिक ठरेल. मुलगी जन्माला आली तरच समाज घडू शकतो. पण आजच्या युगात मुलगी नको अशी प्रवृत्ती वाढत चालली असताना जिजाऊंच्या नावे ठेव ठेवून समाज जिवंत ठेवण्याचा प्रयत्न स्त्युत्य आहे. आजच्या या युगात जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठीच हिंदू खाटीक मागासवर्गीय समाजाचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

समाजाने राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होऊ लागले आहे. प्रत्येक समाजाने असा वेगळा उपक्रम राबवावा, असं आवाहन यानिमित्ताने खाटीक समाजाने केले.

(deposit of Rs 5 Thousand in the name of a girl born in Ichalkaranji on the birth anniversary of Rajmata Jijau)

संबंधित बातम्या

वाढीव वीज बिलावर एकत्र येऊन तोडगा काढायला हवा, मोर्चे नाही, खा. धैर्यशील मानेंचा राजू शेट्टींना टोला

कोल्हापूरची भूमी सोडून पुण्याला गेलेल्या चंद्रकांत पाटलांनी बारा वर्ष पाट्या टाकल्या, सतेज पाटलांचा घणाघात

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.