“शेतकऱ्यांनी नुसता फोटो काढला तरी पैसे देतो”; उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टीकेला उदाहरणासह स्पष्टीकरण दिलं

मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्या झालेल्या नुकसानीवर विरोधकांकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जोरदार आवाज उठविला जात आहे.

शेतकऱ्यांनी नुसता फोटो काढला तरी पैसे देतो; उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टीकेला उदाहरणासह स्पष्टीकरण दिलं
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 7:21 PM

पुणे : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच पुणे दौरा केला. या दौऱ्यावेळी त्यांनी झालेल्या पोटनिवडणुकीविषयी भाजपची पुढील रणनिती आणि आगामी निवडणुकांविषयी का आयोजन असणार आहे यावेळी त्यांनी सडेतोड शब्दात विरोधकांना समजावून सांगितले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत पराभव झाला असला तरी मतदारांचा कौल मान्य करून त्यांनी सांगितले की, आगामी काळातील निवडणुकीबाबत या निकालाचा आम्हाला विचार करता येईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले.

देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, एखादी निवडणूक जिंकतो हरतो मात्र या निकालामुळे फार काही फरक पडत नाही.

त्याचे मुल्यमापन करतो दुसऱ्या भाषेत सांगायचे झाले तर त्याचे पोस्ट मार्टम करतो आणि ते केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्याची योग्य काळजी घेऊ असंही त्यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या विरोधातील नेत्यांवर ईडीकडून कारवाई केली जात आहे. तर आज दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर घरावर दुसऱ्यांदा ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.

त्या ईडीच्या कारवाईविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या कारवाईविषयी मला जास्त काही माहिती नाही वेगवेगळ्या माध्यमांतील बातम्यामधूनच ही गोष्ट कळाली आहे. त्यामुळे त्याविषयी त्यांनी अधिकचे मत काही नोंदवले नाही.

मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्या झालेल्या नुकसानीवर विरोधकांकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जोरदार आवाज उठविला जात आहे.

त्यावर उत्तर देतना ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी नुसता फोटो काढला तरी आमचे सरकार पैसे देते. मात्र विरोधकाचे तसे नाही मात्र याबाबतीत विरोधकांचे आश्चर्य वाटत आहे.

रात्रीच्या वेळी पडलेल्या पावसाचा पंचनामा त्यांनी तरी बघितले आहे का? मात्र तसे नुकसान झाले तर त्याचेही आम्ही पैसे देतो अशी टीका त्यांनी केली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.