अजित पवारांकडून भीमा-कोरेगाव युद्धातील शहीदांना अभिवादन, घरातूनच जयस्तंभाला अभिवादन करण्याचं नागरिकांना आवाहन

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज शौर्यदिनानिमित्त जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी कोरेगाव-भीमा येथे पोहोचले.

अजित पवारांकडून भीमा-कोरेगाव युद्धातील शहीदांना अभिवादन, घरातूनच जयस्तंभाला अभिवादन करण्याचं नागरिकांना आवाहन
Follow us
| Updated on: Jan 01, 2021 | 8:03 AM

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज शौर्यदिनानिमित्त जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी (Ajit Pawar At Koregaon-Bhima) कोरेगाव-भीमा येथे पोहोचले. येथे त्यांनी कोरेगाव-भीमा युद्धाच्या 202 व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी अभिवादन केलं (Ajit Pawar At Koregaon-Bhima).

“सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा, यंदाच हे वर्ष सर्वांसाठी सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावं. गेलं वर्ष कोरोनाचं संकट, त्यामध्ये आलेल्या अडचणी, जगावर देशभरावर अजूनही ते संकट कायम आहे. पण, त्यातून न डगमगता महाविकासआघाडी सरकारने त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. आज 2021 सुरु झालं दरवर्षीप्रमाणे कोरेगाव-भीमाच्या लढाईत जे शूरवीर शहीद झाले, त्या सर्वांना अभिवादन करण्यासाठी मी स्वत:, माझ्यासोबत गृहमंत्री अनिल देशमुख ऊर्जामंत्री नितीत राऊत यांच्यासह अनेक कार्यकर्ते इथे अभिवादन करण्यासाठी आलो”, अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.

“मधल्या काळात या शौर्यदिनाला गालबोट लागलं. मात्र, महाराष्ट्राच्या जनतेने त्या अफवांवर विश्वास ठेवू नये. जनतेने नेहमी शांततेचं याठिकाणी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र कधीही चुकीच्या रस्त्याने गेलेला नाही, ही आपली परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी, शाहू महाराज, महात्मा फुले या सर्वांनी जो आदर्श आपल्यापुढे ठेवला. त्याचाच आदर करत आपण पुढे वाटचाल करत असतो.”

“पोलीस दलाने, प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला. गृहखात्याने नागरिकांना आवाहन केलं होतं की कोरोनाचं संकट असल्यामुळे घरातून जयस्तंभाला अभिवादन करण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे घरातूनच जयस्तंभाला अभिवादन करावे, असं आवाहन करतो. कोरोना काळात सुरक्षितता बाळगणं महत्वाचं आहे”, असे आवाहन अजित पवारांनी केलं.

“महाराष्ट्र शौर्याची भूमी आहे, नेहमीच त्यांनी शौर्य दाखवलं आहे”, असा आपला इतिहास आहे.

“जयस्तंभ विकास आराखडा मंजूर करा, अशी मागणी समोर आली आहे. मा या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मागेही मी यावर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. इथे ज्या जागा आहेत त्या खाजगी लोकांच्या जागा आहेत. येणाऱ्या वर्षांतही लोक इथे अभिवादन करण्यासाठी येत असणार आहेत. त्यामुळे सरकार पुढाकार घेवून इथल्या काही जागा मार्जिनसाठी, लोकांना तिथे सुविधा देण्यासाठी, गर्दी होवून काही वेगळे प्रकार घडू नये त्यासाठी व्यवस्था झाली पाहिजे. असं नियोजन आम्ही केलेलं आहे. स्थानिक ज्यांच्या जमिनी आहेत त्यांना योग्य मोबदला राज्य सरकारकडून दिला जाईल. त्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. काही जमिनी या ताब्यात घेतल्या जातील. राज्य सरकारकडून आर्थिक बाजू साभांळली जाईल”, अशी ग्वाही मी राज्यातील जनतेला देतो.

“मागील सरकारने जो निधी मजूर केला होता तो अजून आला नाहीय, मात्र एकमेकांना ढकलून चालणार नाही”, असंही अजित पवार म्हणाले.

कोरेगाव-भीमा दंगल

कोरेगाव-भीमा युद्धाच्या 200 व्या स्मृतिदिनी 1 जानेवारी 2018 मध्ये हिंसाचार घडला होता. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यूही झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. त्यापार्श्वभूमीवर अशी कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठा चोख बंदोबस्त तिथे ठेवण्यात आला आहे.शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव-भीमा परिसरात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्याशिवाय, काल संध्याकाळ 5 वाजल्यापासून आज रात्री 12 पर्यंत पुणे – अहमदनगर महामार्गही बंद ठेवण्यात आला आहे.

इतिहास काय?

1 जानेवारी 1818 रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटीश सैनिकांदरम्यान युद्ध झाले होते. या युद्धात ब्रिटिशांनी विजय मिळवला होता. ब्रिटिशांच्या विजयाचा जल्लोष महार समाज साजरा करतो. कारण ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर महार समाजाचे सैनिक होते. त्यावेळी महार समाजातील लोकांना अस्पृश्य मानण्यात येत असे.

हे युद्ध भीमा कोरेगावची लढाई या नावानं प्रसिद्ध आहे. जाणकारांच्या मते, दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं 28 हजारांचं सैन्य पुण्यावर हल्ला करण्यासाठी सज्ज होतं. यावेळी आक्रमणादरम्यान त्यांच्यासमोर ब्रिटीश सैन्याची कुमक असलेली तुकडी उभी ठाकली. या तुकडीत 800 सैनिकांचा समावेश होता. पेशव्यांनी कोरेगावस्थित ईस्ट इंडिया कंपनीवर आक्रमणासाठी 2000 सैनिकांचा समावेश असलेली फौज पाठवली होती.

फ्रान्सिस स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडियाच्या कंपनीच्या या तुकडीनं 12 तास खिंड लढवली आणि पेशव्यांना जिंकू दिलं नाही. यानंतर पेशव्यांनी निर्णय बदलला आणि ते परतले, असा उल्लेख तत्कालीन इतिहासावरच्या पुस्तकात सापडतो (Ajit Pawar At Koregaon-Bhima)

दरम्यान ईस्ट इंडिया कंपनीच्या या तुकडीत भारतीय वंशाचे काही सैनिक होते. यापैकी अनेक जण हे महार समाजाचे होते. हे सगळेजण बॉम्बे नेटिव्ह इन्फॅन्ट्री विभागाशी संलग्न होते. म्हणूनच ही घटना इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे म्हटलं जातं.

Ajit Pawar At Koregaon-Bhima

संबंधित बातम्या :

भीमा कोरेगाव प्रकरण : गौतम नवलखा आयएसआयच्या संपर्कात; NIAचा आरोपपत्रात दावा

कोरेगाव भीमाला जाणार, प्रसंगी न्यायालयात जाऊ: चंद्रशेखर आझाद

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.