अजित पवार यांनी बारामतीकरांपुढे व्यक्त केली ‘ती’ खदखद, राष्ट्रवादी फुटीवर काय म्हणाले?

अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज बारामतीत पहिलं भाषण केलं. अजित पवार मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीत भाषण करणार असल्याने ते काय बोलणार याकडे अनेकांचं लक्ष होतं. अखेर अजित पवार यांनी बारामतीत सलग एक तास भाषण केलं. यावेळी त्यांनी आपण सत्तेत का सहभागी झालो? याविषयी बारामतीकरांना माहिती दिली.

अजित पवार यांनी बारामतीकरांपुढे व्यक्त केली 'ती' खदखद, राष्ट्रवादी फुटीवर काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 9:46 PM

बारामती | 26 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच ते बारामतीत दाखल झाले. यावेळी त्यांच्या हजारो समर्थकांकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या स्वागतामुळे अजित पवार प्रचंड भारावले. त्यांनी आपल्या भाषणात याबाबत उल्लेख केला. यावेळी त्यांनी नागरिकांना बारामतीत सुरु असलेल्या विकासकामांची सविस्तर माहिती दिली. अजित पवार यांना नागरी पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आलं.

अजित पवार आजच्या कार्यक्रमात भाषण करणार हे सर्वांना माहिती होतं. पण अजित पवार आपल्या बारामतीतील भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीवर काही बोलणार का? ते नेमकं काय बोलतील? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अजित पवार यांची जवळपास तीन ते चार तास मिरवणूक बारामतीत निघाली. त्यानंतर अजित पवार यांनी तब्बल एक तास भाषण केलं. पण अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीवर ब्र शब्द देखील काढला नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, यावेळी त्यांनी आपल्याला 2004 साली मुख्यमंत्री होता आलं असतं, अशी खदखद अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली.

अजित पवार यांनी बारामतीकरांपुढे ती खदखद व्यक्त केली

“2004 ला देखील राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळाला असतं. पण आता मी काय करणार? त्या संदर्भात मला काही गोष्टी बोलता येत नाहीत”, असं अजित पवार आजच्या बारामतीतील भाषणात म्हणाले. “काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी सांगितलं होतं की, विलासराव राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार निवडून आले आहेत तरी मुख्यमंत्री झाले नाही”, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं.

“माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करताना देखील अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद घेऊ शकलो असतो. पण मी खोलात जाऊन चर्चा करणार नाही. उपमुख्यमंत्री पदाला न्याय देण्यासाठी मी काम करेन”, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं.

दरम्यान, या कार्यक्रमात एक गोष्ट प्रकर्षाने बघायला मिळाली. बारामतीतील भाषणात अजित पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख देखील करण्यात आला नाही. याउलट अजित पवारांकडून पंतप्रधान मोदींचं मात्र भरभरून कौतुक करण्यात आलं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.