Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharpur Wari | आधी आळंदी विश्वस्थांनी तीन पर्याय सुचवले, आता अजित पवारांनी चौथा पर्याय निवडला

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पुढील पंधरा दिवसातील स्थिती पाहून पुन्हा वारकरी सांप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करुन आणि विश्वासात घेवूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल.

Pandharpur Wari | आधी आळंदी विश्वस्थांनी तीन पर्याय सुचवले, आता अजित पवारांनी चौथा पर्याय निवडला
Follow us
| Updated on: May 15, 2020 | 9:04 PM

पुणे : कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय घेण्यात (Ajit Pawar On Ashadhi Wari) येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं. पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज आषाढी वारी बाबत बैठक पार पडली. तेव्हा वारकरी विश्वस्थांनी अजित पवारांसमोर तीन पर्याय ठेवले होते. मात्र, अजित पवारांनी चौथा पर्याय निवडत 30 मेनंतर यावर निर्णय (Ajit Pawar On Ashadhi Wari) देण्यात येईल, असं सांगितलं.

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता त्यांची स्थिती पाहून 30 मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करुन देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हटलं.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक वर्षाची या वारीला परंपरा आहे, राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेत पुढील पंधरा दिवसातील कोरोना स्थिती पाहून पुन्हा वारकरी सांप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करुन आणि विश्वासात घेवूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरुप कसे असावे, याबाबत आळंदी आणि देहू या दोन्ही संस्थान प्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानुसार लॉकडाऊनचे स्वरुप पाहता श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पायी वारी आणि पालखी सोहळ्याच्या स्वरुपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

सोलापूर, सातारा आणि पंढरपूर येथील मान्यवरांची आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबतची मते विचारात घेतली जाणार आहेत. राज्य मंत्रीमंडळ बैठकीतही याबाबत चर्चा केली जाणार असून त्यांनतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचं पवार यांनी (Ajit Pawar On Ashadhi Wari) स्पष्ट केले.

वारकरी विश्वस्थांनी अजित पवारांसमोर तीन पर्याय ठेवले होते

या बैठकीत वारकरी विश्वस्थांनी अजित पवारांसमोर वारी करण्यासाठी तीन पर्याय ठेवले होते.

  • 300 वारकरी घेऊन वारी करण्याची परवानगी द्या
  • 200 मानाचे दिंडीप्रमुख आणि विणेकरी यांना घेऊन वारी करण्याची परवानगी मिळावी
  • वाहनात पालखी घालून 40 वारकरी पंढरपुरला जातील

शासन जो निर्णय घेईल त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करु : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाची नियमावली, लॉकडाऊन स्थिती आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण, दिंडी सोहळयाचे स्वरुप कशा प्रकारे करावे, या बाबत शासन देत असलेल्या निर्णयानुसारच नियोजन करण्यात येईल, तसेच शासन जो निर्णय घेईल त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करु, असे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील आणि देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे यांनी सांगितले.

या बैठकीमध्ये पालखी सोहळ्याचे स्वरुप, सहभागी वारकरी, सोशल डिस्टसिंग, प्रशासकीय यंत्रणेबाबतच नियोजन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याच्या आयोजनाबाबतचे पर्याय, पंढरपूर येथील नियोजन तसेच विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली.

पंढरपूर आषाढी वारी

महाराष्ट्रभरातून मानाच्या सात पालख्यांसह छोट्या-मोठ्या शंभर ते दीडशे पालख्या आणि अंदाजे पंधरा ते वीस लाख वारकरी हे दरवर्षी मजल दरमजल करत आषाढी वारीला पंढरपूरला जात असतात. मात्र, या वर्षी पंढरपूर वारीवर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे वारकऱ्यांनीही घरुनच पंढरीच्या विठुरायाला नमस्कार करण्याचा आदर्श निर्णय (Ajit Pawar On Ashadhi Wari) घेतला आहे.

संबंधित बातम्या :

आषाढी वारी फक्त वीस वारकऱ्यांसोबत करा, आळंदीच्या ग्रामस्थांचा पर्याय

देहू, आळंदी पालखी सोहळ्याबाबत दोन दिवसात निर्णय, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Pandharpur Wari | माऊलींच्या पालखीची परंपरा अखंडित ठेवण्याचा निर्धार, नियमांचे काटेकोर पालन करणार

राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले.
मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले
मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले.
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी.
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या.
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला.
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर.
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?.
जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र
जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र.
अवकाळीनं राज्याला झोडपलं, बळीराजा हवालदिल; कोणत्या जिल्ह्यांना तडाखा?
अवकाळीनं राज्याला झोडपलं, बळीराजा हवालदिल; कोणत्या जिल्ह्यांना तडाखा?.
हिंदूत्व सोडल का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं, ठाकरेंचा हल्लाबोल
हिंदूत्व सोडल का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं, ठाकरेंचा हल्लाबोल.