पटोलेंनी अधिवेशनानंतर राजीनामा दिला असता, तर अधिक बरं : अजित पवार
"पटोलेंनी अधिवेशनानंतर राजीनामा दिला असता, तर अधिक बरं झालं असतं", असं अजित पवार म्हणाले.
पुणे : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला (Nana Patole Resignation). त्यानंतर राज्यात जोरदार राजकीय हालचाली होत असल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) नाना पटोलेंच्या या निर्णयावर नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, आता या विषयावर स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. “पटोलेंनी अधिवेशनानंतर राजीनामा दिला असता, तर अधिक बरं झालं असतं”, असं अजित पवार म्हणाले (Deputy CM Ajit Pawar Reaction On The Resignation Of Nana Patole).
उपमुख्यमंत्र्यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. “नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर मी कशाला नाराज होणार. शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेच हे आधी ठरलं होतं. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला ठरलं होतं. चर्चा करतात, नाना पटोलेंनी सर्वांशी चर्चा केली. आघाडी सरकारमध्ये चर्चेने मार्ग काढले जातात”, असं ते यावेळी म्हणाले.
तसेच, “काँग्रेसला पदं मिळाली आहेत. त्यांनी काय करावं हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे. मात्र, अधिवेशन संपल्यावर नाना पटोलेंनी राजीनामा दिला असता तर अधिक बरं झालं असतं. पण त्यांच्या हायकमांडने निर्णय दिला”, असं त्यांनी सांगितलं.
नाना पटोले यांचा राजीनामा
नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे त्यांनी आपल्या राजीनामा सुपूर्द केलाय. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आपल्याला राजीनामा देण्यास सांगितल्यामुळे आपण विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली आहे. “पाणी वाहतं राहिलं तर ते स्वच्छ असतं. यापुढे आता पक्ष जी काही जबाबदारी देईल ती जबाबदारी स्वीकारेल आणि त्या जबाबदारीला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करेन. माझ्या पक्षाध्यक्षांनी जो आदेश दिला त्यानुसार मी तुमच्या सगळ्यांसमोर राजीनामा दिला. आता विधानसभेच्या अध्यक्षपदी कोण ते तीनही पक्षांचे हाय कमांड निर्णय घेईल”, असंही पटोले म्हणाले.
मोठा भावाने घेतल्यानंतर राहिलेलं दुसरा भाऊ आणि शेवटी तिसरा भाऊ घेतो – उपमुख्यमंत्री
“कावळ्याच्या शापाने गुरं मरत नसतात, त्यांचं नाव घेऊन अधिक महत्त्व कशाला द्यायचं”, असं म्हणत अजित पवारांनी राणेंच्या ट्वीटला प्रतिउत्तर दिलं.
“शिवसेना मोठा पक्ष आहे. मोठा भावाने घेतल्यानंतर राहिलेलं दुसरा भाऊ आणि शेवटी तिसरा भाऊ घेतो”, असंही ते म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपावरही अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. “धनंजय मुंडेंच्या मुलांचा जबाब पोलिसांनी घेतला आहे. तक्रार आली की ब्रेकिंग न्यूज, मागे घेतली की हळूच सांगतात”, असं म्हणत त्यांनी माध्यमांनाही खडसावलं.
नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाराज? https://t.co/tRsipW4bOb @OfficeofUT @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE @ShivSena @INCMaharashtra @NCPspeaks #nanapatole #nanapatoleresigh #uddhavThackeray #ajitpawar
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 4, 2021
Deputy CM Ajit Pawar Reaction On The Resignation Of Nana Patole
संबंधित बातम्या :
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंना ना ना? अमित देशमुखांचं नाव चर्चेत, काय घडतंय पडद्याआड?
उपमुख्यमंत्रीपदाची मागणी कुठून आली माहित नाही, पण एकत्र बसून चर्चा करु-काँग्रेस मंत्री
शरद पवार म्हणाले, काँग्रेसच्या अंतर्गत वादातून राजीनामा, नाना पटोले म्हणतात….