Devendra Fadnavis : ‘हे माऊली…’ भाजपाला लागले मुख्यमंत्रीपदाचे वेध; पुण्यात देवेंद्र फडणवीसांच्या नावे कशी होतेय पोस्टरबाजी? पाहा…

सध्या संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुणे मुक्कामी आहे. येथून पंढरपूरकडे पालखीसह वारकरी प्रयाण करतील. दुसरीकडे राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच यावेत, यासाठी कार्यकर्त्यांनीदेखील पोस्टरबाजी सुरू केली आहे.

Devendra Fadnavis : 'हे माऊली...' भाजपाला लागले मुख्यमंत्रीपदाचे वेध; पुण्यात देवेंद्र फडणवीसांच्या नावे कशी होतेय पोस्टरबाजी? पाहा...
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी यावेत अशी पुण्यात करण्यात आलेली पोस्टरबाजीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 3:44 PM

पुणे : शिवसेनेत एकीकडे फाटाफूट सुरू असून दुसरीकडे भाजपात मात्र आनंदाचे वातावरण आहे. आपला मुख्यमंत्री होणार असल्याचे वेध भाजपाला लागले आहेत. त्याचाच परिणाम पुण्यातही दिसून येत आहे. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्ष नेते असलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी पुण्यात पाहायला मिळत आहे. यंदाची आषाढीची पंढरपुरातली पूजा देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते व्हावी, असे त्यात म्हटले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्याने सध्या महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. अजून निश्चित आकडेवारी समोर आलेली नसली तरी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 45हून अधिक आमदार असल्याचा दावा केला जात आहे. तसे झाले तर महाविकास आघाडीचे बहुमत अल्पमतात रुपांतरीत होईल. त्यामुळे भाजपाला (BJP) संधी असून आता पुढील रणनीती आखली जात आहे.

‘हे माऊली, तुझा कृपा आशीर्वाद सदैव राहू दे’

सध्या संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुणे मुक्कामी आहे. येथून पंढरपूरकडे पालखीसह वारकरी प्रयाण करतील. दुसरीकडे राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच यावेत, यासाठी कार्यकर्त्यांनीदेखील पोस्टरबाजी सुरू केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या शिवाजीनगर विभागातील भाजपाचे पदाधिकारी प्रकाश सोलंकी आणि रवींद्र साळेगावर यांनी ही पोस्टर्स लावली आहेत. ‘हे माऊली, तुझा कृपा आशीर्वाद सदैव राहू दे. तुझ्या पंढरपूरच्या पूजेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येवू दे!’ असे पोस्टरवर छापण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

‘अधर्माचे सरकार कोसळेल’

मागील अडीच वर्षांपासून जो राज्यात अधर्म सुरू होता, त्याला लाथाडण्याची वेळ आली आहे. यावर्षीची आषाढीची पूजा अधर्म केलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार नाही. महाराष्ट्रात रामराज्याची स्थापना होईल आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून आषाढीची पूजा करतील, हा ईश्वरी संकेत आहे, असे भाजपा अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले काल म्हणाले होते. 24 तासांत सर्वकाही आलबेल होईल आणि अधर्माचे सरकार कोसळेल, असेही ते म्हणाले होते.

काय म्हणाले होते तुषार भोसले?

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.