देवेंद्र फडणवीस त्यांना थांबवत का नाहीत, रुपाली पाटील ठोंबरे यांचा निशाणा कुणाकडं

अमृता फडणवीस या शिकलेल्या आहेत. का अशा बेताल वक्तव्य करतात. का देवेंद्र फडणवीस त्यांना थांबवत नाहीत.

देवेंद्र फडणवीस त्यांना थांबवत का नाहीत, रुपाली पाटील ठोंबरे यांचा निशाणा कुणाकडं
रुपाली पाटील ठोंबरे
Follow us
| Updated on: Dec 22, 2022 | 6:22 PM

पुणे : खासदार राहुल शेवाळे यांनी एयू म्हणजे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे असावेत, असा आरोप केला. त्यानंतर शेवाळे यांच्यावर ठाकरे गटाकडून टीकेची झोड उठत आहे. रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, राहुल शेवाळे यांच्या पत्नीवरही अन्याय झाला. त्यावर आदित्य ठाकरे बोललेत. जिच्यावर गुन्हा झाला नाही. तिला न्याय देण्यासाठी भाजपची लोकं बेंबीच्या देठापासून ओरडतात. जिला न्याय हवा तिच्याकडं बघतपण नाही. भाजपच्या महिलाही तशा आहेत. कायद्यानं गुन्हा घडला असेल, तर न्याय देणं हे लोकप्रतिनिधींचं काम आहे. शेवाळे हे बायकोला पुढं करतात. तीही बिचारी माऊली कुंकवासाठी नवऱ्याचं पाप पदरात घेते. आपल्या नवऱ्याचं कुकर्म लपविण्यासाठी तु्म्ही पुढं येता. पण, तुमच्या नवऱ्यानं जिच्यावर अत्याचार केलेला आहे. त्या जागेवर आपलंही कुणीतरी असतं तर तुम्ही गप्प बसला असतात का हो, असा सवाल रुपाली पाटील ठोंबरे यांनी विचारला.

तुमच्याकडं सत्ता आहे म्हणून गैरवापर करू नका. जे अधिकारी गैरवापर करण्याचं काम करतील, त्यांना घरी पाठविण्याचं आम्ही काम करू. कायद्यानं राज्य चाललं पाहिजे. आदित्य ठाकरे यांचं नाव नसतांना त्यांची बदनामी कशासाठी, असा प्रश्न रुपाली पाटील ठोंबरे यांनी विचारला.

आदित्य ठाकरे यांना कचाट्यात पकडण्यासाठी शिंदे आणि फडणवीस किती खोटी फौज उभी करू शकतात. याचं उत्तर उदाहरण हिवाळी अधिवेशन आहे. हिवाळी अधिवेशन कशासाठी हे जरी सरकारला कळलं तरी आम्ही आमचं भाग्य मानू, असंही त्या म्हणाल्यात.

अमृता फडणवीस यांचं वक्तव्य आहे. दोन राष्ट्रपिता आहेत. जुन्या भारताचे महात्मा गांधी आणि नव्या भारताचे नरेंद्र मोदी. अशी वक्तव्य अमृता फडणवीस या जाणूनबुजून करत असल्याचं रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या. हिवाळी अधिवेशनात नसलेले विषय उपस्थित करून आमच्याकडून उत्तर दिलं जावं म्हणून. यात वेळ वाया जातो. दिवस पुढं जातो. ही त्यांची नीती आहे.

अमृता फडणवीस या शिकलेल्या आहेत. का अशा बेताल वक्तव्य करतात. का देवेंद्र फडणवीस त्यांना थांबवत नाहीत. उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत त्या. वाहतुकीमुळं घटस्फोट होतात. वेशा व्यवसाय हा प्रोफेशनल केला पाहिजे. अनेक वक्तव्य आहेत त्यांची. पण, त्यांना का थांबविलं जात नाही. मला लाज वाटते. उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अशी वक्तव्य का करतात, असा घणाघातही रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.