Devendra Fadnavis Video : हे सगळे एकाच बापाची औलाद निघाले, फडणवीसांच्या या वक्तव्याचा संदर्भ काय?

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी आर्य आणि द्रविड संघर्ष (Arya Dravid Theory) यावर सडकून टीका केली आहे. तसेच ही थेअरीच पूर्ण चुकीची असल्याचे संशोधनातून सिद्ध झाल्याचे म्हणले आहे.

Devendra Fadnavis Video : हे सगळे एकाच बापाची औलाद निघाले, फडणवीसांच्या या वक्तव्याचा संदर्भ काय?
हे सगळे एकाच बापाची औलाद निघाले, फडणवीसांच्या या वक्तव्याचा संदर्भ काय?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 11:56 PM

पुणे : आज पुण्यात प्रा. ना. स. फरांदे स्मृती प्रतिष्ठान तर्फे आयोजित दीपस्तंभ ग्रंथाचं प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी आर्य आणि द्रविड संघर्ष (Arya Dravid Theory) यावर सडकून टीका केली आहे. तसेच ही थेअरीच पूर्ण चुकीची असल्याचे संशोधनातून सिद्ध झाल्याचे म्हणले आहे. हे सर्व एकाच बापाची औलद असून या सगळ्यांचा डीएनए एकच निघाल्याचेही फडणवीस निघाले आहे. अलिकडच्या काळात कार्बन डेटिंगपेक्षा डीएनए टेस्टिंग (DNA) हा अत्यंत महत्त्वाचा विषय तयार झालाय.असेही वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पुण्यात बोलताना फडणवीस म्हणाले, “आज भारतातला सगळ्यात प्रीव्हीटीव्ह ट्रायब म्हणून जे अंदमानचे आदीवासी आहेत, ते असतील, किंवा बंगलमद्ये राहणारे ब्राम्हण असतील. किंवा साऊथमध्ये राहणारे नायर असतली. किंवा उत्तर प्रदेशात राहणारे ज्यांना आपण दलीत समाजाचे म्हटले आहे, असे असतील. या सगळ्यांचा डीएनए एकच निघाला. हे सगळे एकाच बापाची औलाद निघाले, असे फडणवीस म्हणाले आहेत.

इतरांनी आपल्याला गुलाम बनवण्यासाठी हे केलं

तसेच “त्यामुळे ही सगळी थिअरी की जो कुणीतरी आर्य आहे, कुणीतरी द्रवीड आहे. कुणीतरी ब्राम्हण आहे. कुणीतरी शुद्र आहे. हे सगळं संपलं आहे. हे कुठेतरी मानवनिर्मित आहे. आणि हे काही लोकांनी नंतरच्या काळात आपल्या फायद्यासाठी वापरलं, तसेच इंग्रजांनी त्याला भारतावर राज्य करण्याकरता वापरलं, अशी सगळी थिअरी आज आपल्या समोर आहे, असे विधान पुण्यात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. त्यामुळे सध्या या वक्तव्याची राज्यात चांगलीच चर्चा आहे. या डीएनएचा वापर करून काही लोक युरोपात गेले. इतर ठिकाणी गेले, त्यामुळे ही थिअरी चुकीची असल्याचे सिद्ध झाले आहे”. असेही फडणवीस म्हणाले आहेत.

भारतात राहणारे एकाच डीएनएचे

तसेच “भारतात राहणारे सर्व एकाच डीएनएचे आहेत, असेही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. आपल्या देशाला पारतंत्र्यात टाकण्यासाठी भारतीय समाजाचा तेजोभंग केला गेला. आत्मभान आणि आत्मतेज हरवतं तेव्हा माणसाला लवकर गुलाम करता येतं. राम मंदिरावर, श्रीकृष्ण भूमीवर त्यामुळे मुघल आणि इतरांनी हल्ले केले. कारण भारतावर आक्रमण करण्याला हे सर्व माहिती होतं त्यामुळे हे सर्व झालं, तसेच आमचा विचार तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे हेही दाखवण्याचा प्रयत्न झाला. आमचा ईश्वर, आमची संस्कृती तुमच्यापेक्षा श्रेष्ठ हेच दाखवण्यासाठी हे केलं गेलं”, असेही फडणवीस म्हणाले.

मशीद बांधायला तीच जागा मिळाली?

“अन्यथा ते लोकं बाबरी मशीद दुसऱ्या ठीकाणी बाधू शकले असते. तुम्ही ताजमहल बाधू शकता तर मशीदही बाधू शकला असता, मशीद बांधणे हे उदीष्टच नव्हतं, भारतीयांचा तेजोभंग करण्याचा हा प्रयत्न होता”. म्हणत, फडणवीसांनी आर्य-द्रविड थेअरी चुकीचे असल्याचे सांगितले आहे.

Sanjay Raut : न्यायालयाबाबतचं वक्तव्य संजय राऊतांना भोवणार? इंडियन बार असोसिएशनची हायकोर्टात याचिका

Dhananjay Munde on Raj Thackeray : ‘भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरु’, धनंजय मुंडेंकडून राज ठाकरेंचा ‘अर्धवटराव’ म्हणून उल्लेख!

BJP Polkhol Abhiyan : ‘ऊठ मुंबईकर ऊठ, उघड तुझी मुठ आणि थांबव शिवसेनेची लूट’, मुंबई महापालिकेसाठी मुनगंटीवारांचा नारा, शिवसेनेवर हल्लाबोल

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.