Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune cycle track : मास्टर प्लॅन केला, विकास आराखड्यात तरतूदही केली, पण सायकल ट्रॅकवरचं अतिक्रमण जैसे थेच! सायकलस्वारांमध्ये नाराजी

सायकल ट्रॅकच्या स्थितीवर सायकलिस्ट मात्र नाराज आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही ठिकाणी सायकल ट्रॅक बनविले आहेत. मात्र त्यावरून क्वचितच सायकल दिसते. इतर वाहनांचे प्रमाणच अधिक दिसून येत आहे.

Pune cycle track : मास्टर प्लॅन केला, विकास आराखड्यात तरतूदही केली, पण सायकल ट्रॅकवरचं अतिक्रमण जैसे थेच! सायकलस्वारांमध्ये नाराजी
पुण्यातील सायकल ट्रॅकImage Credit source: architecturepressrelease
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 11:26 AM

पुणे : सायकल ट्रॅक आणि त्यावर होणाऱ्या अतिक्रमणावर (Encroachment) सायकलस्वारांनी नाराजी व्यक्त केली आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात सायकल ट्रॅकचा विषय चर्चेत आहे. महापालिकेकडून (PMC) सायकल चालवण्यास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनातून योजनाही आणली आहे. सायकल मास्टर प्लॅन तयार करण्याच्या संदर्भामध्ये सूचना आणि हरकती महापालितेने मागवल्या आहेत. पुण्यातील ही स्थिती आहे. दुसरीकडे पिंपरी चिंचवड परिसरातील सायकल ट्रॅकची अवस्था फारशी चांगली नाही. येथेही इतर वाहनधारकांकडून अतिक्रमण होत असल्याचे दिसून येत आहे. येत्या 27 ऑगस्ट म्हणजेच उद्यापर्यंत ही मुदत असणार आहे. रस्त्यांचे नियोजन (Planning) करताना सायकल ट्रॅकसाठी तरतूद अनिवार्य आणि निश्चित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महापालिकेने 28 जुलै रोजी पुण्याच्या विकास आराखड्यात सायकल मास्टर प्लॅनचा (Master plan) समावेश करण्याची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आणि 30 दिवसांत जनतेला त्यांचे मत देण्याचे आवाहन केले होते.

‘योग्य वापर होत नाही’

सायकल ट्रॅकच्या स्थितीवर सायकलिस्ट मात्र नाराज आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही ठिकाणी सायकल ट्रॅक बनविले आहेत. मात्र त्यावरून क्वचितच सायकल दिसते. इतर वाहनांचे प्रमाणच अधिक दिसून येत आहे. सायकल वापरणारेच नसतील तर ट्रॅक तरी काय कामाचे, अशी नाराजी नागरिक उपस्थित करत आहेत. शहरात मोठे रस्ते आणि त्याला साजेसे फुटपाथ तर त्याच्या शेजारीच सायकल ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. याला लाल रंग देऊन सायकलचे चिन्हही देण्यात आले आहे. मात्र याचा योग्य वापर होताना दिसत नाही.

‘सायकल वापरणाऱ्यांचे तीन गट’

साधारणपणे सायकल वापरणाऱ्यांचे तीन गट दिसतात. एक तर रोजचे, दैनंदिन काम करण्यासाठी सायकलचा उपयोग करणारा कष्टकरी वर्ग, दुसरा म्हणजे पर्यावरणाबाबत जागृती असणारे नागरिक आणि आयटीतील आहे. तर तिसरा वर्ग हा कोरोनानंतर व्यायामासाठी सायकल चालविणाऱ्या नागरिकांचा वर्ग होय. सायकल तर लोक चालवतात मात्र सायकल ट्रॅकवर अत्यंत तुरळक सायकली दिसून येतात.

‘ट्रॅकचा उपयोग योग्य त्या कामासाठीच व्हावा’

ट्रॅकचा उपयोग योग्य त्या कामासाठीच व्हायला हवा. महापालिकेने योजना आणून, पैसे खर्च करून उपयोग नाही. जनजागृती करणे, अतिक्रमण होणार नाही याविषयी दक्षता घेणे अशा बाबी अपेक्षित असल्याचे सामान्य नागरिक आणि सायकलपटूंचे मत आहे.

फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न.