Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात भाजमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर, मेधा कुलकर्णी यांचा नेमका निशाणा कुणावर?

पुण्यात भाजपमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. विशेष म्हणजे यावेळी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्ट करत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या नाराजीची दखल पक्षश्रेष्ठी घेतील का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

पुण्यात भाजमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर, मेधा कुलकर्णी यांचा नेमका निशाणा कुणावर?
medha kulkarni and chandrakant patil
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 9:52 PM

पुणे | 11 ऑगस्ट 2023 : पुण्यातील चांदणी चौक उड्डाणपुलाचं उद्या उद्घाटन होणार आहे. पण या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाआधीच भाजपमधील नाराजीनाट्य चव्हाट्यावर आलं आहे. या उद्घाटनाच्या सोहळ्यात डावलल्याचा आरोप भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. कोथरुडमधील सध्याचे नेते माझं अस्तित्व मिटवत आहेत, अशा शब्दांत मेधा कुलकर्णी यांनी नाव न घेता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. मेधा कुलकर्णी या भाजपच्या माजी आमदार आहेत. त्या कोथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडून येत होत्या.

चौंदणी चौक उड्डाणपुलाच्या उद्घाटन सोहळ्याच्या परिपत्रकात आणि इतर निर्णयामध्ये आपल्याला डावलल्याचा आरोप मेधा कुलकर्णी केला आहे. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. कोथरुडचे सध्याचे आमदार हे चंद्रकांत पाटील हे आहेत. त्यामुळे मेधा कुलकर्णी यांनी आपल्या पोस्टमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावरच नाव न घेता गंभीर आरोप केला आहे. विशेष म्हणजे मेधा कुलकर्णी यांची नाराजी व्यक्त करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीदेखील त्यांनी भाजपच्या वरिष्ठांकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

मेधा कुलकर्णी यांनी याआधी त्यांचं विधानसभेचं तिकीट कापलं गेलं तेव्हा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. तसेच पक्षाच्या एकूण निर्णय प्रक्रियेत आपल्याला सामावून घेतलं जात नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावेळी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं आहे. दरम्यान, आपण पक्षातील वरिष्ठांशी बोलणार असल्याचं मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं आहे. यावर पक्षाचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात, मेधा कुलकर्णी यांची समजूत काढली जाते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

असे निष्ठावंतांचे डावलेले जिणे’, मेधा कुलकर्णी यांची खंत

मेधा कुलकर्णी यांनी ‘असे निष्ठावंतांचे डावलेले जिणे’ अशा शिर्षकाखाली फेसबुकर पोस्ट केली आहे. “माझ्यावरील कुरघोड्या, डावलणे याबद्दल मी जाहीर वाच्यता केली नव्हती. वाटले बोलावे तुमच्याशी. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरुडमधील पत्रके पाहिले आणि खूप वाईट वाटले. चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कुणी?”, असा सवाल मेधा कुलकर्णी यांनी केला.

मेधा कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट, जसीच्या तशी

“स्वतः गडकरी यांनी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हटलं होतं की, “तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला”. अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते’ या विषयी सहभागी नव्हते. तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते..”.

“माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून सर्व ठिकाणचे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही. साधे कोथरूडच्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणीमध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे”.

“गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत. देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाहीय”.

“माझ्याबाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेलंय”.

राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं...
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं....
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट.
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?.
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?.
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या...
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या....
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?.
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली.
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या.
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?.