Mumbai-Pune : पुणे-मुंबईदरम्यानचे धोकादायक घाट आता ‘ड्रोन’च्या नजरेत! पावसाळ्यात सुरक्षित प्रवासासाठी मध्य रेल्वेचा प्रयत्न
कोविडनंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरू झाल्यापासून, घाट विभागातून दररोज सुमारे 74 मेल, एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर गाड्या आणि 18 मालवाहू गाड्या जातात. घाट विभागात कर्जत, पळसधरी, जांबरूंग, ठाकूरवाडी, नागनाथ, मंकी हिल, खंडाळा आणि लोणावळा यासह आठ स्थानके (Stations) आहेत.
पुणे : पावसाळ्यापूर्वी पुणे-मुंबई दरम्यान सुरक्षित ट्रेन प्रवासासाठीची तयारी करण्यासाठी मध्य रेल्वेने (Central Railway) घाट विभागातील 600 खड्डे स्कॅनिंगचे काम हाती घेतले आहे. मध्ये रेल्वेतर्फे प्रथमच अशाप्रकारचे काम हाती घेण्यात आले आहे. खड्डे दुरुस्तीचे सध्या सुरू असलेले काम मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. असे असताना घाटात (Ghat section) खड्डे पडू, दरडी कोसळू नयेत यासाठीची कामेही हाती घेण्यात आली आहेत. पावसाळ्यासाठी धोकादायक ठिकाणी एकूण 145 सीसीटीव्ही कॅमेरे तात्पुरत्या स्वरूपात बसविण्यात आले आहेत. कोविडनंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरू झाल्यापासून, घाट विभागातून दररोज सुमारे 74 मेल, एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर गाड्या आणि 18 मालवाहू गाड्या जातात. घाट विभागात कर्जत, पळसधरी, जांबरूंग, ठाकूरवाडी, नागनाथ, मंकी हिल, खंडाळा आणि लोणावळा यासह आठ स्थानके (Stations) आहेत.
‘सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार’
प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी पुणे ते मुंबई रेल्वे मार्गावरील घाट विभागातील गाड्या सुरक्षितपणे चालविण्यासंबंधी अनेक कामे सुरू केली जातात. सध्या, प्रमुख कामांपैकी एक म्हणजे बोल्डर स्कॅनिंग आणि ड्रॉपिंग जे सध्या सुरू करण्यात आले आहे. घाट विभागात 600पेक्षा जास्त दरडी आहेत, जे आमच्या बोल्डर स्कॅनिंग टीमद्वारे स्कॅन केले जात आहेतजिथे आम्ही पोहोचू शकत नाहीत किंवा आणीबाणीच्या काळात कोणतीही समस्या आधीच लक्षात यावी म्हणून या वर्षी आम्ही काही ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करणार आहोत. सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या असूनही भूस्खलनाची कोणतीही घटना घडल्यास, त्वरित मदतकार्यासाठी पथके आहेत आणि कमीतकमी वेळेत, खड्डे काढले जातील, ट्रॅक सुरक्षा तपासणी केली जाईल आणि सामान्य ट्रेनच्या सेवा पुन्हा सुरू होतील, अशी माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली.
दरडी कोसळण्याच्या घटना
पुणे-मुंबई दरम्यानच्या घाट विभागात खड्डे पडणे ही एक सामान्य समस्या आहे. दरवर्षी पावसाळ्यात घाटांच्या विविध भागात दरडी कोसळण्याच्या घटना घडत असता. काही किरकोळ तर काही मोठ्या घटना घडतात. रुळांवर पडलेले दगड तसेच माती साफ करण्यास वेळ लागतो. गेल्या पाच वर्षांपासून पुणे ते मुंबई रेल्वे मार्गावरील घाट विभागात दरडी कोसळण्याच्या सुमारे 30 घटना घडल्या आहेत. 30 घटनांपैकी, 3 ऑक्टोबर 2019रोजी मोठ्या भूस्खलनानंतर भोर घाटातील मंकी हिल विभागात रेल्वे वाहतूक थांबवावी लागली होती. तर घाट विभागातील दुरुस्तीची कामे करण्यासाठी इंटरसिटी दरम्यानची रेल्वे वाहतूक 14 दिवस बंद ठेवण्यात आली होती. घाट विभागातील सीआरद्वारे आतापर्यंतची ही सर्वात जास्त काळ चाललेली ऑपरेशन्स होती.
‘रेल्वेची तयारी योग्यच’
नियमित प्रवासी या वर्षी भूस्खलनमुक्त मान्सूनच्या आशेवर आहेत. आम्ही आठवड्यातून दोनदा कामानिमित्त पुणे ते मुंबई रेल्वेने प्रवास करत असतो. पावसाळ्यात दरड कोसळण्याची भीती असते. जर रेल्वे आधीच त्यासाठी तयारी करत असेल तर ते चांगले आहे. परंतु प्रवाशांची सुरक्षा आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी वेळ वाढवणे आवश्यक आहे, असे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे म्हणणे आहे.