Drunk And Drive : आता दारु पिऊन वाहन चालवलं तर लायसन्स रद्द होणार भावा, या शहरात लागू झाला कायदा

Driving License Canceled : राज्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना सातत्याने वाढत आहे. अपघातांची मालिका सुरुच आहे. त्यामुळे एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता या शहरात तळीरामांना दारु पिऊन वाहन चालविता येणार नाही.

Drunk And Drive : आता दारु पिऊन वाहन चालवलं तर लायसन्स रद्द होणार भावा, या शहरात लागू झाला कायदा
तळीरामांना पोलिसांचा दणकाImage Credit source: छायाचित्र प्रतिनिधीक
Follow us
| Updated on: Jul 10, 2024 | 10:42 AM

राज्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या प्रकरणांची मालिका सुरुच आहे. त्यात अनेकांच्या प्रिय व्यक्तींना गमविण्याची वेळ आली आहे. बड्या धेंडांना वाचविण्यासाठी प्रशासनाची तत्परता पण दिसून आली आहे. देशभरातून या प्रकाराबद्दल संताप व्यक्त होत असल्याने अखेर राज्याच्या सांस्कृतिक राजधानी, पुण्यात पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तळीरामांची तंद्री उडणार आहे. या शहरात दारु पिऊन वाहन चालविता येणार नाही. काय आहे हा निर्णय, त्यात काय होणार कारवाई जाणून घेऊयात…

पुण्यात इतके गुन्हे दाखल

पुण्यात वाढणाऱ्या ड्रिंक अँड ड्राईव्ह घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावलं उचलायला सुरुवात झाली आहे. पुण्यात गेल्या ६ महिन्यात १६८४ जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी दारू पिऊन वाहन चालवणे यांच्यावर फक्त खटले पाठवून त्यांच्यावर कारवाई केली जात होती.

हे सुद्धा वाचा

आता थेट परवानाच रद्द

मात्र यापुढे जर आता कोणी चालक दारू पिऊन गाडी चालवताना आढळून आला तर पहिल्यांदा त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स ३ महिने रद्द केले जाईल, त्याच व्यक्तीने जर पुन्हा गुन्हा केला तर ६ महिन्यापर्यंत त्याचा परवाना रद्द होणार मात्र तिसऱ्या वेळीस पुन्हा तीच व्यक्ती आढळून आली तेव्हा मात्र त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरूपी रद्द होणार अशी माहिती पुणे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे.

कल्याणीनगर प्रकरणात देशभरातून संताप

पुण्यातील बहुचर्चित कल्याणीनगर कार अपघात प्रकरणाने देशात एकच संताप उसळला होता. आरोपीला वाचविण्यासाठी सर्वच यंत्रणा कामाला लागल्याचे सुरुवातीला दिसून आले होते. जनक्षोभ वाढताच त्याच यंत्रणांचा सूर आणि नूर पालटला. त्यानंतर या रविवारी पुण्यातील बोपोडीत हिट अँड रन प्रकरण घडले. फरसखाना ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांना काही मद्यपींनी पेटवून दिल्याचे प्रकरण ताजे असताना आता पोलिसांनी याप्रकाराला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या प्रकारात घट होते का? की निर्ढावलेल्या मद्यपींसाठी कडक उपाय करावे लागतात हे चित्र लवकरच स्पष्ट होईल.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.