मोठी बातमी: ऑनलाईन शिक्षण महागलं; बालभारतीच्या अ‍ॅप्लिकेशनसाठी आता पैसे मोजावे लागणार

Online education | या अ‍ॅपसाठी बालभारतीकडून 50 रुपये नोंदणी शुल्क आकारले जाणार आहे. या अ‍ॅपवर सध्या इयत्ता पहिले ते पाचवी आणि इयत्ता दहावी मराठी आणि इंग्रजी माध्यमाचे ई-साहित्य उपलब्ध होईल.

मोठी बातमी: ऑनलाईन शिक्षण महागलं; बालभारतीच्या अ‍ॅप्लिकेशनसाठी आता पैसे मोजावे लागणार
ऑनलाईन शिक्षण
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 9:37 AM

पुणे: कोरोनामुळे शाळा बंद असलेल्या विद्यार्थी आणि पालकांसमोरील समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण, बालभारतीकडून पुरवण्यात येणाऱ्या ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी आता पैसे मोजावे लागणार आहे. अगोदरच ऑनलाईन शिक्षणासाठी (Online education) मुलांना स्मार्टफोन किंवा टॅब घेऊन देण्याची वेळ पालकांवर आली होती. अशातच आता बालभारतीचे ई-साहित्य सशुल्क झाल्याने पालकांना नवा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. ( Now students have to pay for Ebalbharati books diksha app)

बालभारतीकडून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे ई-साहित्य उपलब्ध म्हणून पाठ्यपुस्तकांची पीडीएफ, ‘दिक्षा अ‍ॅप’द्वारे व्हिडिओ असे साहित्य उपलब्ध करून दिले जाते. अशात आता अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा असेल, तर विद्यार्थ्यांसाठी बालभारतीने ‘ई-बालभारती’ अ‍ॅप केलं विकसित केले आहे. मात्र, हे अ‍ॅप वापरण्यासाठी नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे. या निर्णयावर शाळा, शिक्षक, विद्यार्थी-पालक यांनी केली नाराजी व्यक्त केली आहे.

बालभारतीचं स्पष्टीकरण

या निर्णयानंतर टीकेचा सूर उमटल्यानंतर बालभारतीकडून तातडीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सर्वांनीच नवे अ‍ॅप वापरण्याची सक्ती नाही. या अ‍ॅपसाठी बालभारतीकडून 50 रुपये नोंदणी शुल्क आकारले जाणार आहे. या अ‍ॅपवर सध्या इयत्ता पहिले ते पाचवी आणि इयत्ता दहावी मराठी आणि इंग्रजी माध्यमाचे ई-साहित्य उपलब्ध होईल. लवकरच उर्वरित इयत्तांचा अभ्यासक्रमही अ‍ॅपवर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे बालभारतीकडून सांगण्यात आले.

संबंधित बातम्या:

कोरोनानं आई वडील गमावलेल्या विद्यार्थ्यांचं शुल्क माफ होणार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा निर्णय

CBSE ने लॉंच केलं हँडबुक, इयत्ता 6 वी आणि 8 वीच्या विद्यार्थ्यांना ‘हँडक्राफ्ट’ शिकण्याची संधी

नाशिकमध्ये वाढीव शाळा फीचा वाद पेटला, पालकांची आक्रमक भूमिका, पोलिसांची मध्यस्थी

( Now students have to pay for Ebalbharati books diksha app)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.