Avinash Bhosale : सीबीआयनंतर ईडीचाही अविनाश भोसलेंना दणका; पुण्यातली साडे चार कोटींची मालमत्ता करावी लागणार रिकामी
अविनाश भोसले यांना सीबीआयने आधीच अटक केली आहे. त्यांना आठ जूनपर्यंत कोठडीही सुनावण्यात आली आहे. यातच ईडीनेही त्यांना नोटीस बजावली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणाव्यतिरिक्त ईडीने (ED) फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे.
पुणे : प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. सीबीआयने (CBI) त्यांना अटक केल्यानंतर आता ईडीनेही कारवाईची नोटीस बजावली आहे. या नोटिशीत त्यांना त्यांची पुण्यातली मालमत्ता रिकामी करण्यास सांगितले आहे. गेल्या वर्षी मनी लाँडरिंग प्रकरणात ही मालमत्ता ईडीने जप्त केली होती. या मालमत्तेची किंमत साधारण 4 कोटी 73 लाख इतकी आहे. दरम्यान, अविनाश भोसले यांना सीबीआयने आधीच अटक केली आहे. त्यांना आठ जूनपर्यंत कोठडीही सुनावण्यात आली आहे. यातच ईडीनेही त्यांना नोटीस बजावली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणाव्यतिरिक्त ईडीने (ED) फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे. याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली होती. तर येस बँक-डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी त्यांचा सीबीआयकडून तपास सुरू असून आठ जूनपर्यंत ते सीबीआय कोठडीत असणार आहेत.
प्रकरण नेमके काय?
येस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएलमध्ये 3700 कोटी रुपये कर्जऱोख्यांतून गुंतवले होते. यात राणा यांना 600 कोटींची दलाली मिळाल्याचे समोर आले होते. त्यानंतर डीएचएफएलने हे पैसे छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुप, भोसले यांच्या इन्फ्रा लिमिटेड आणि बलवा आणि गोएंकाच्या कंपनीत वळते केले होते. त्यानंतर छाब्रियांना अटक करताच भोसले, बलवा आणि गोएंका यांच्यावर सीबीआयने छापेमारी केली होती. डीएचएफएल म्हणजेच दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने येस बँकेकडून 750 कोटींचे कर्ज घेतले होते. पण त्याचा वापरच करण्यात आला नाही, असे तपासात समोर आले होते.
After CBI arrested businessman Avinash Bhosle, ED issued a fresh notice to vacate his property in Pune which was attached by the agency in a money laundering case last year.
Avinash Bhosale has been taken to Delhi by CBI for further investigation.
— ANI (@ANI) June 2, 2022
कोण आहेत अविनाश भोसले?
अविनाश भोसले हे सुरूवातीला रिक्षाचालकाचे काम करायचे. भाड्याच्या घरात राहून त्यांनी भाड्याने रिक्षा देण्यास सुरूवात केली. त्यानंतर बांधकाम व्यवसायाशी संबंध आला आणि ते सरकारी कंत्राटदार बनले. हजारो कोटींच्या एबीआयएल ग्रुपचे भोसले हेच मालक आहेत.पुण्यात त्यांची रिअल इस्टेट किंग अशी ओळख आहे. अविनाश भोसले हे फक्त व्यावसायिक नाहीत तर त्यांची राजकीय नेत्यांशीही सोयरिक आहे. कारण अविनाश भोसले हे मंत्री विश्वजित कदम यांचे सासरे आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भोसले यांचेही संबंध चांगले आहेत.