ED | ईडीच्या अधिकाऱ्यांचा अ‌ॅड. असीम सरोदेंना फोन, साडे तीनला ईडीची टीम सरोदेंच्या कार्यालयात

ईडीचे अधिकारी थोड्याच वेळात अ‌ॅड. असीम सरोदे यांच्या कार्यालयात एकनाथ खडसेंच्या केसची माहिती घेण्यासाठी पोहोचणार आहेत. (Asim Sarode ED officers )

ED | ईडीच्या अधिकाऱ्यांचा अ‌ॅड. असीम सरोदेंना फोन, साडे तीनला ईडीची टीम सरोदेंच्या कार्यालयात
एकनाथ खडसे अ‌ॅड. असीम सरोदे
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 4:01 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) केस प्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीचे (ED) अधिकाऱ्यांनी अ‌ॅड. असीम सरोदे (Asim Sarode) यांना फोन केल्याची माहिती मिळत आहे. ईडीचे अधिकारी थोड्याच वेळात सरोदे यांच्या कार्यालयात पोहोचणार आहेत. एकनाथ खडसेंच्या केससंदर्भातील कागदपत्रांचा तपास करण्यासाठी ईडीकडून फोन आल्याची माहिती आहे. (ED officers will reach at Adv. Asim Sarode office regarding Eknath Khadse case)

अ‌ॅड. असीम सरोदे यांच्याकडे खडसेंच्या केसबद्दल माहिती घेण्यासाडी ईडीचे अधिकारी  जाणार आहे.  ईडीची टीम सरोदेंच्या कार्यालयात 3.30 वाजता पोहोचणार आहे.  अ‌ॅड. असीम सरोदे दोन हजार पानांची माहिती ईडीकडे देण्याची शक्यता आहे.  एकनाथ खडसे यांना ईडीकडून भोसरी जमीन प्रकरणी 30 डिसेंबरला ईडीसमोर हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, एकनाथ खडसेंना कोरोना झाल्यामुळे ते ईडीसमोर हजर राहिले नव्हते.

भोसरी जमीन प्रकरणी एकनाथ खडसेंना नोटीस

भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना 30 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे ईडीचे समन्स मिळाले होते. भोसरी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसेंना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली. एकनाथ खडसेंनी याप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर केली होती. ईडीची नोटीस आल्याचे एकनाथ खडसेंनी मान्य केले होते. ईडीसमोर हजर राहण्यापूर्वीच एकनाथ खडसेंना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे ईडीनं त्यांना 14 दिवसानंतर हजर राहण्याची मुभा दिली होती. या पार्श्वभूमीवर ईडीची टीम अ‌ॅड. असीम सरोदे यांच्याकडे खडसेंच्या कागदपत्रांबद्दल तपास करणार आहे.

एकनाथ खडसेंची भूमिका

“यापूर्वी अनेकदा माझी चौकशी केली आहे. त्यावेळी मी हजर राहिलो आहे. त्यांनी माझ्याकडे जे कागदपत्रं मागितले, ते मी दिले आहेत. याही वेळेस ईडी जे काही कागदपत्रं मागतील त्यांनी मी सहकार्य करेन,” अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान आली.

“माझ्या बायकोने भोसरी या ठिकाणी एक भूखंड खरेदी केला आहे. त्याबाबत ही नोटीस दिली आहे. त्या यापूर्वी चार वेळा चौकशी झाली आहे. ही पाचव्यांदा चौकशी होत आहे. हा व्यवहार रेडी रेकनरच्या दरानुसार पाच कोटींचा आहे. ती चौकशी करण्याचा ईडीला अधिकार आहे. त्यामुळे ईडीला सहकार्य करु. मी जास्त काही बोलणार नाही. जे काही आहे ते नंतर बोलेन,” असेही एकनाथ खडसे म्हणाले.

संबंधित बातम्या:

इकडे खडसेंना नोटीस, तिकडे अंजली दमानिया ED आणि सीबीआयलाच कोर्टात खेचण्याच्या तयारीत

Eknath Khadse | त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, एकनाथ खडसेंचा इशारा

(ED officers will reach at Adv. Asim Sarode office regarding Eknath Khadse case)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.