बिल्डर युसूफ लकडावाला यांची ईडी चौकशी, हैदराबादच्या नवाबाची खंडाळ्यातील जमीन लाटल्याचा आरोप

बिल्डर युसूफ लकडावाला यांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून गुरुवारी चौकशी करण्यात आली. (ED questions Builder Yusuf Lakdawala )

बिल्डर युसूफ लकडावाला यांची ईडी चौकशी, हैदराबादच्या नवाबाची खंडाळ्यातील जमीन लाटल्याचा आरोप
बिल्डर युसुफ लकडावाला
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 8:11 AM

मुंबई : चित्रपट निर्माते आणि बांधकाम व्यावसायिक युसूफ लकडावाला (Yusuf Lakdawala) यांची अंमलबजावणी संचलनालयाकडून चौकशी करण्यात आली. हैदराबादच्या नवाबाची खंडाळा (Khandala) येथील 50 कोटी रुपयांची जमीन अल्प किमतीत लाटल्याचा आरोप आहे. खंडाळ्याच्या या जमिनीशी संबंधित बिल्डरच्या काही संशयास्पद व्यवहारांची ईडी चौकशी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (ED questions Builder Yusuf Lakdawala in Khandala land grab case)

बिल्डर युसूफ लकडावाला यांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून गुरुवारी चौकशी करण्यात आली. युसूफ लडकावालांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी घरुन ईडी कार्यालयात आणलं होतं. युसूफ लकडावाला यांच्याविरोधात एप्रिल 2019 मध्ये आर्थिक गुन्हे विभागाने गुन्हा दाखल केला होता. हाच गुन्हा आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे नोंदवून तपास सुरु केला आहे.

खंडाळ्यातील कथित मनी लॉन्ड्रिंग

पुणे जिल्ह्यातील खंडाळा येथे हैदराबादचे नवाब हिमायत नवाज जंग बहादूर (Hyderabad Nawab Himayat Nawaz Jung Bahadur) यांच्या मालकीच्या जमिनीशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंगचे हे प्रकरण आहे. ही जमीन 50 कोटी रुपयांची असल्याचे म्हटले जाते. मात्र लकडावाला यांनी जमीन ताब्यात घेण्यासाठी सरकारी अधिकारी, इस्टेट एजंट्स आणि इतर आरोपींना सुमारे 11.5 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. अधिकृत नोंदीनुसार सर्व्हे नंबर 104 (सीटीएस नंबर 11, 11A, 11B) वरील जागा 4 एकर आणि 38 गुंठ्यांची आहे.

कोणत्या कलमांअंतर्गत कारवाई

मावळ तालुका उपनिबंधक जितेंद्र बडगुजर यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर लकडावाला आणि इतरांविरूद्ध फसवणूक, कट रचणे अशा आरोपांखाली भादंवि कलम 465, 466, 467, 468, 471, 420, 120-B आणि 201 नुसार, तर भारतीय नोंदणी अधिनियम कलम 82 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अभिनेत्री साधना यांच्या केसमध्येही कारवाई

76 वर्षीय युसूफ लकडावाला यांनी गुरुवारी ईडी कार्यालयात जबाब नोंदवला. याआधी अनेक वेळा समन्स बजावूनही लकडावाला चौकशीसाठी गैरहजर राहिले होते. याआधी, अभिनेत्री साधना यांच्या राहत्या जागेला बळकावून धमकावल्याबद्दल युसूफ लकडावाला आणि त्यांच्या पत्नीला मुंबई पोलिसांनी अटक केली होती.

संबंधित बातम्या :

शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा संशय, ईडी चौकशी

(ED questions Builder Yusuf Lakdawala in Khandala land grab case)

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.