ईडी अविनाश भोसलेंची पुन्हा चौकशी करणार; धाडलं आणखी एक समन्स
परकीय चलन नियमन कायद्यातंर्गत अविनाश भोसले यांनी सहा वर्षांपूर्वी केलेल्या एका व्यवहाराची चौकशी होत आहे. | Avinash Bhosale
पुणे: रिअल इस्टेट किंग अविनाश भोसले (Avinash Bhosale Pune) आणि त्यांचा मुलगा अमित भोसले यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. ‘ईडी’कडून गुरुवारी या दोघांनाही आणखी एक समन्स बजावण्यात आले. आता उद्या साधारण चार वाजता या दोघांची एकत्र चौकशी केली जाईल. (ED issue fresh summons to Avinash Bhosale)
परकीय चलन नियमन कायद्यातंर्गत अविनाश भोसले यांनी सहा वर्षांपूर्वी केलेल्या एका व्यवहाराची चौकशी होत आहे. यापूर्वीही ईडीने अविनाश भोसले यांना अनेकदा चौकशीसाठी बोलावले होते. 10 फेब्रुवारीला अंमलबजावणी संचलनालय अर्थात ED ने अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर छापाही टाकला होता. गुरुवारी ईडीने अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले यांनाही चौकशीसाठी पाचारण केले होते. आज पहाटे अमित भोसले यांची साधारण चार तास चौकशी झाल्याचे समजते. त्यानंतर उद्या या पिता-पुत्रांची पुन्हा एकदा चौकशी होईल.
यापूर्वीही ईडीकडून चौकशी
दरम्यान, अविनाश भोसले यांची यापूर्वीही ईडीने चौकशी केली होती. नोव्हेंबर महिन्यात तब्बल दहा तास त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली होती. FEMA कायद्यांतर्गत त्यांची चौकशी करण्यात आल्याचं वृत्त आहे. यापूर्वीही आयकर विभागाने भोसले यांच्या घरावर छापा मारला होता. भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील 23 ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी मारल्या होत्या.
मुलीलाही नोटीस?
अविनाश भोसले यांच्यासह त्यांच्या मुलीला म्हणजेच राज्याचे कृषीराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांनाही ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती आहे. दोन आठवड्यापूर्वीच हे वृत्त आलं होतं. मात्र याबाबत विश्वजीत कदम यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.
संबंधित बातम्या:
रिअल इस्टेट किंग अविनाश भोसले यांची 10 तास चौकशी; ईडी कार्यालयातून बाहेर
Special Report | व्हाईट हाऊसमध्ये राहणारे अविनाश भोसले नेमके कोण?
(ED issue fresh summons to Avinash Bhosale)